पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत

तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिसच्या (Post office plan) विविध योजनांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर राहु शकते. पोस्ट ऑफीसच्या योजनांमधून तुम्हाला बँकांच्या तुलनेत अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा पैसे, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:48 PM

नवी दिल्ली : तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिसच्या (Post office plan) विविध योजनांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर राहु शकते. पोस्ट ऑफीसच्या योजनांमधून तुम्हाला बँकांच्या तुलनेत अधिक चांगला परतावा मिळू शकतो, तसेच पोस्टाच्या विविध योजनांमधून मिळणारे व्याज देखील अधिक असते. तुम्ही जर एखाद्या बँकेमध्ये मुदत ठेव योजनेंतर्गत पैसे गुंतवले असतील आणि त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला केवळ 5 लाखांपर्यंतचेच पैसे परत मिळू शकतात. मात्र पोस्टमध्ये असे नसते तुम्हाला तुमचे सर्व पैसे हे केव्हाही वापस मिळू शकतात. त्यामुळे पोस्ट ऑफीसमध्ये पैसे गुंतवल्यास आपल्याला कमीत कमी जोखीमेमध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. पोस्टाने सुरू केलेली अशीच एक उत्कृष्ट योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana) ही आहे. या योजनेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

व्याज दर 

या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर 7.6 टक्के व्याज मिळते. रकमेवर दरवर्षी एक एप्रीलपासून व्याजदर लागू होते. या योजनेमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. एका ठराविक कालावधीनंतर त्याचा चांगला परतावा तुम्हाला मिळतो.

खाते कोणाला उघडता येते?

जे दहा वर्षांच्या आतील मुलींचे पालक आहेत, असे कोणीही पोस्टाच्या या योजनेमध्ये खाते उघडू  शकतात. पालकांना आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडता येते. खाते उघडल्यानंतर दर वर्षी एक ठराविक रक्कम या खात्यात जमा करावी लागते. मुलगी एकवीस वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा कालावधी पूर्ण होतो. मात्र त्या आधीही मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला तिचे लग्न करायचे असेल तरीही तुम्हाला ही रक्कम काढता येते. या रकमेचा उपयोग आपण मुलीचे लग्न आणि शिक्षणासाठी करू शकतो.

संबंधित बातम्या 

Stock market : शेअर मार्केटचा बिग बुल कोट्यवधींना बुडाला, राकेश झुनझुनवालांना 753 कोटींचा फटका

Stock market : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गुंतवणूकदारांना धडकी, शेअर मार्केटसह कमोडीटी मार्केटलाही फटका

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.