Suniel Shetty : सुनील शेट्टी यांचा ‘वायू’ घालणार बाजारात धुमाकूळ! झोमॅटो, स्विगीला टफ फाईट

Suniel Shetty : मराठी माणसाच्या स्टार्टअपमध्ये सुनील शेट्टी यांनी फंडिंग केले. वायू नावाच्या स्वस्त फूड डिलिव्हरी ॲप त्यांनी लॉन्च केले. स्विगी, झोमॅटो यांना आता तगडी फाईट मिळणार हे नक्की..

Suniel Shetty : सुनील शेट्टी यांचा 'वायू' घालणार बाजारात धुमाकूळ! झोमॅटो, स्विगीला टफ फाईट
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 11:36 AM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी नवीन फूड डिलिव्हरी ॲप लॉन्च केले. हा मराठी माणसांचा स्टार्टअप आहे. दोन मराठी तरुणांनी हे स्टार्टअप सुरु केले आहे. तर सुनील शेट्टी यांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे. या स्टार्टअपचे वैशिष्ट्ये म्हणजे झोमॅटो आणि स्विगीपेक्षा यामध्ये विविध खाद्यपदार्थांच्या किंमती कमी असतील आणि त्यावर ऑफरचा भडिमार असेल. वायू (Waayu) असे या फूड डिलिव्हरी ॲपचे नाव आहे. एका द्यावानुसार, इतर अग्रीग्रेटर्सं, सेवा प्रदात्यांपेक्षा ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवर 15 ते 20 टक्के स्वस्तात अन्नपदार्थ मिळतील. फूड डिलिव्हरीसंबंधीच्या सेवा सुलभरित्या ग्राहकांना पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा दावा नवीन फूड डिलिव्हरी ॲप (Food Delivery App) लॉन्च करताना करण्यात आला.

कोण आहेत मराठी तरुण वायू ॲप डेस्टेक होरेका या कंपनीचा एक भाग आहे. तंत्रज्ञ आणि उद्योजक अनिरुद्ध कोटगिरे आणि मंदार लांडे यांनी वायू ला बाजारात उतरविले आहे. वायू या स्टार्टअपला मुंबईतील इंडियन होटल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) आणि इतर उद्योगांचा पाठिंबा मिळाला आहे. या प्लॅटफॉर्मवर मुंबईतील 1,000 हून अधिक रेस्टॉरंट जोडलेले आहेत. यामध्ये भगत ताराचंद, महेश लंच होम, बनाना लीफ, शिव सागर, गुरु कृपा, किर्ती महल, फारसी दरबार आणि लाडू सम्राट यांच्या सहभाग आहे. कंपनीने अभिनेता आणि हॉटेल व्यवसायिक सुनील शेट्टी यांना वायूचा ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे.

रेस्टॉरंटकडून नाही घेणार कमिशन WAAYU ॲप रेस्टॉरंटकडून कोणतेही कमिशन घेणार नाही. त्यामुळे रेस्टॉरंट ग्राहकांना किफायतशीर दरात अन्नपदार्थ जलदरित्या देऊ शकतील. त्यामुळे इतर फूड डिलिव्हरी कंपन्यांपेक्षा वायूकडून ग्राहकांना स्वस्तात अन्नपदार्थ मिळत आहे. किफायतशीर दरात, स्वच्छ, चांगले खाद्यपदार्थ जलद पोहचविणे हे या ॲपचे उद्दिष्ट आहे. स्वस्त खाद्यपदार्थ पोहचविण्याचा हा उपक्रम ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. आता कंपनी किती कालावधीसाठी ही स्वस्तातील सेवा पुरविणार हे समोर येईलच.

हे सुद्धा वाचा

अक्षय कुमार नाही मागे पुण्यातील स्टार्टअपचे नाव ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म (TBOF) आहे. या स्टार्टअपला बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि धडाकेबाज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी पाठिंबा दिला आहे. या दोघांनी या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्री-सिरीज ए फंडिंग राऊंडच्या माध्यमातून या स्टार्टअपने मोठा निधी जमाविला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सेहवाग आणि इतर सेलिब्रिटींनी एकूण 14.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सत्यजीत आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी 2019 मध्ये टीबीओएफची स्थापना केली होती.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.