Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnikant Net Worth : ‘थलायवा’ इतक्या संपत्तीचा मालक! आलिशान बंगला, लक्झरी कारचा ताफा

Rajnikant Net Worth : सुपरस्टार रजनीकांत यांचे गारुड भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आहे. फॅन्स त्यांना आदराने आणि प्रेमाने थलायवा म्हणतात. त्यांच्याकडे आलिशान कारचा ताफा आहे. आलिशान बंगला आहे. या मराठी माणूस इतक्या संपत्तीचा मालक आहे.

Rajnikant Net Worth : 'थलायवा' इतक्या संपत्तीचा मालक! आलिशान बंगला, लक्झरी कारचा ताफा
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:04 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : भारतीय सिनेमातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajnikant) यांना कोण ओळखत नाही. त्यांचे गारुड देशातच नाही तर जगभर आहे. त्यांचे फॅन्स भारतातच नाही तर चीन आणि जपान या देशात पण आहेत. त्यांचा नवीन चित्रपट जेलर नुकताच प्रदर्शीत झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी बजावली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 52 कोटी रुपयांची कमाई केली. रजनीकांत यांच्या नावावर आणि त्यांच्या स्टाईलवर चित्रपट चालतात. त्यांच्या अनेक चित्रपटांनी कोट्यवधींचा गल्ला जमाविण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. पण ते किती श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे किती संपत्ती (Networth) आहे, याची फार कमी जणांना माहिती आहे. त्यांच्याकडे आलिशान कारचा ताफा आहे. त्यांना महागड्या वस्तूंचा छंद आहे.

यावर्षी केली होती सुरुवात

रजनीकांत अनेक दशकांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांची खास स्टाईल पाहण्यासाठी लोक सिनेमागृहात गर्दी करतात. अपूर्वा रागंगल या तामिळ चित्रपटापासून त्यांनी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच ते त्यांच्या खास अंदाज, हटके स्टाईलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. रजनीकांत यांनी अन्नामलाई (1992), बाशा (1995), मन्नान (1992), चंद्रमुखी (2005), शिवाजी (2007) असे अनेक ब्‍लॉक बस्‍टर सिनेमा दिले.

हे सुद्धा वाचा

रजनीकांत इतक्या संपत्तीचे धनी

भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांना फोर्ब्सने 2010 मध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव केला होता. त्यांची एकूण संपत्ती 52 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 430 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता. रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतात. जर चित्रपट चालला नाही. बॉक्स ऑफिसवर त्याने कमाई केली नाही तर, रजनीकांत घेतलेली रक्कम परत करत असल्याचे सांगण्यात येते. ते कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत नाहीत.

रजनीकांतचे आलिशान घर

थलायवा या नावाने लोकप्रिय रजनीकांत यांच्याकडे चेन्नई शहरात आलिशान घर आहे. 2002 मध्ये त्यांनी हे घर तयार केले होते. सध्या या घराची किंमत जवळपास 4.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 35 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे राघवेंद्र मंडपम या नावाने एक लग्नाचा हॉल पण आहे. यामध्ये 275 पाहुण्यांच्या राहण्याची सोय होते. तर 1000 पाहुणे बसण्याची क्षमता आहे. त्याची किंमत 20 कोटी रुपये आहे.

आलिशान कारचा ताफा

रजनीकांत यांच्याकडे दोन रोल्स रॉयल्स या आलिशान कार आहेत. 6 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट आणि 16.5 कोटींची रोल्स रॉयस फँटम आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, होंडा सिव्हिक, प्रीमिअर पद्मिनी अशा कारचा ताफा आहे. महागडी कार BMW X5 जिची किंमत 1.77 कोटी आहे. 2.55 कोटींची मर्सिडीज आणि 3.10 कोटींची लम्बोर्गिनी उरुस ही कार आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.