ATM Card : एटीएम कार्डची चिंता मिटणार, विना कार्ड कॅश विद्ड्रॉल; सर्व बँकांना अनिवार्य

देशातील सर्व बँका व एटीएम ऑपरेटर्सना यांना विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांना एटीएम मध्ये विना कार्ड पैसे (CARDLESS TRANSACTION) काढण्याची व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यूपीआय समकक्ष अॅपच्या माध्यमातून पैसे काढले जाऊ शकतात.

ATM Card : एटीएम कार्डची चिंता मिटणार, विना कार्ड कॅश विद्ड्रॉल; सर्व बँकांना अनिवार्य
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 11:20 PM

नवी दिल्लीएटीएम मधून विना कार्ड पैसे (ATM CASH WIDRAW) काढण्याचा तुम्ही विचार केला होता का? एटीएम मधून विना कार्ड पैसे काढू शकता. त्यामुळे येत्या काळात पूर्णवेळ एटीएम कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. देशातील सर्व बँका व एटीएम ऑपरेटर्सना यांना विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांना एटीएम मध्ये विना कार्ड पैसे (CARDLESS TRANSACTION) काढण्याची व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यूपीआय समकक्ष अॅपच्या माध्यमातून पैसे काढले जाऊ शकतात. सद्यस्थितीत देशातील मोजक्या एटीएम केंद्रावर सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पूर्ण क्षमतेनं अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या (RESEREV BANK OF INDIA) निर्देशानंतर विना कार्ड एटीएम मधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाकांक्षी धोरण:

नव्या पद्धतीनुसार यूपीआय पिनचा उपयोग व्यवहाराच्या अधिकृततेसाठी करण्यात येईल. विशेष म्हणजे यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सेवा पूर्णपणे नि:शुल्क असेल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व्यवहारांच्या डिजिटल स्वरुपासाठी प्रयत्नशील आहे. विना कार्ड पैसे काढणे हा त्याच उपक्रमाचा महत्वाकांक्षी भाग मानला जातो.

एटीएममध्ये लवकरच कार्यान्वित:

निवडक बँकात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. सेवेच्या सार्वत्रिकरणासाठी एटीएम मध्ये मुलभूत स्वरुपाचे बदल हाती घ्यावे लागतील. एटीएम मध्ये यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा लागेल. नवी व्यवस्था प्रत्यक्षात आल्यास कार्डची ऐवश्यकता भासणार नाही. केवळ एटीएम वरील क्यूआर कोड स्कॅन करण्याद्वारे व्यवहार प्रत्यक्षात येईल.

हे सुद्धा वाचा

यूपीआय संरचनेचे महत्वाचे तीन फायदे सांगितले जातात

· केवळ यूपीआय मार्फत होणारं ट्रान्झॅक्शनची कार्यपदधती अत्यंत सुलभ मानली जाते

· एटीएम मध्ये व्यवहारासाठी यापुढील काळात प्रत्यक्ष कार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.

· विना कार्ड व्यवहार केल्यामुळे होणाऱ्या गैरव्यवहारांना थेट प्रतिबंध करता येईल. माहिती गुप्तपणे प्राप्त करुन गैरव्यवहाराचे प्रकार अलीकडच्या काळात समोर आले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.