Mukesh Ambani : उद्योग जगतातील ‘गुरु’ मुकेश अंबानी यांचे कोण आहेत खास ‘गुरु’! कोणाकडून घेतात कानमंत्र, कोणाचा ऐकतात सल्ला

Mukesh Ambani : भारतीय उद्योग जगतातील गुरु असलेले मुकेश अंबानी कोणाचा सल्ला मानतात, कोणाचा कान मंत्र घेतात, कोण आहेत त्यांचे गुरु, तुम्हाला पडेलल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात

Mukesh Ambani : उद्योग जगतातील 'गुरु' मुकेश अंबानी यांचे कोण आहेत खास 'गुरु'! कोणाकडून घेतात कानमंत्र, कोणाचा ऐकतात सल्ला
कोणाचे मिळेत मार्गदर्शन
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांच्या अचूक निर्णयासाठी ओळखले जाते. आतापर्यंत त्यांनी ज्या उद्योगात हात घातला. ज्या व्यवसायाची पायभरणी केली. त्याची बाजारात जोरदार घौडदौड सुरु आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) कारभार सातत्याने वाढत आहे. रिलायन्स समूहाचा सातत्याने विस्तार होत आहे. धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अंबानी कुटुंबिय अनेकदा धार्मिक कार्यक्रमात दिसातत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची आई कोकिलाबेन अंबानी या धार्मिक वृत्तीच्या आहेत. रिलायन्सच्या यशामागे त्यांची टीम, अचूक निर्णय महत्वाचे आहेत. पण फारच कमी लोकांना मुकेश अंबानी यांच्या आध्यात्मिक गुरुबद्दल माहिती आहे.

या गुरुंचे मार्गदर्शन अंबानी कुटुंबिय (Ambani Family) प्रत्येक मोठं काम करण्यापूर्वी या आध्यात्मिक गुरुचा सल्ला घेतातच. मुकेश अंबानी यांच्या आध्यात्मिक गुरुंचे नाव रमेश भाई ओझा (Ramesh Bhai Ojha) आहे. ते भाईश्री नावाने सुप्रसिद्ध आहेत. रमेश भाई ओझा यांचा शद्ब रिलायन्स इंडस्ट्रीमध्येच नाही तर अंबानी कुटुंबियांमध्ये प्रमाण आहे. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात व्यापार आणि उद्योगातून वाद झाले. हे वाद ओझा यांनीच मिटवले.

कोण आहेत रमेश भाई ओझा रमेश भाई ओझा एक लोकप्रिय आध्यात्मिक गुरु आहे. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. रमेश भाई गुजरातमधील पोरबंदर येथे आश्रम चालवितात. या आश्रमाचे नाव संदीपनी विद्यानिकेतन आश्रम आहे. ते धीरुभाई अंबानी यांच्या काळापासून अंबानी कुटुंबियांच्या पाठिशी आहेत. कोकिलाबेन नेहमीच त्यांचे प्रवचन ऐकतात. त्यांना अंबानी कुटुंबियांनी 1997 मध्ये राम कथेसाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम एक आठवडा चालला होता. या दरम्यान रमेश भाई ओझा आणि अंबानी कुटुंबिय यांच्यातील नात्यातील घट्ट वीण समोर आली होती.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक मोठ्या कामापूर्वी घेतात सल्ला अंबानी कुटुंबिय प्रत्येक मोठं काम सुरु करण्यापूर्वी गुरु रमेश भाई ओझा यांचा सल्ला घेतात. जामनगर येथे रिलायन्सची पहिली रिफाईनरी स्थापन झाली. त्याचे उद्धघाटन रमेश भाई ओझा यांनी केले होते. रमेश भाई ओझा यांचा जन्म गुजरातमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आजी भगवत गीतेची निस्सीम भक्त होती. आपल्या घरात प्रत्येक दिवशी भगवत गीतेचा अध्याय वाचला जावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे रमेश भाई ओझा दररोज गीतेचे वाचन करत होते. त्यामुळे त्यांचा आध्यात्मकाकडे ओढा वाढला आणि ते आध्यात्मिक गुरु झाले.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.