AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलातील हे रूम आयुष्यात कधीच बुक करू नका, नाही तर… त्या गोष्टींमुळे…

Hotels Room booking tips : हॉटेल बुकिंग करताना काही गोष्टींची नेहमी काळजी घ्या. गडबडीत एक चूक पण महागात पडते. त्यामुळे या टिप्स तुम्हाला हॉटेल बुक करताना उपयोगी पडू शकते.

हॉटेलातील हे रूम आयुष्यात कधीच बुक करू नका, नाही तर... त्या गोष्टींमुळे...
Follow us
| Updated on: Feb 20, 2025 | 3:17 PM

पर्यटन, भ्रमंती करणार्‍यांना जग सुद्धा छोटं पडतं. ते दर महिन्याला कुठे ना कुठे फिरण्याची हौस भागवतात. ते सतत ट्रेन, फ्लाईट, बस आणि हॉटेलची बुकिंग करतात. हॉटेल बुकिंगसाठी अनेक साईट, ॲप्स आहेत. त्या बुकिंगवर केवळ डिस्काऊंटच नाहीतर चांगल्या ऑफर सुद्धा देतात. तुम्हाला हॉटेल बुक करताना काही टिप्स उपयोगी पडतील. असे म्हणतात की हॉटेलमधील काही खोल्या कधीच बुक करू नये. नाहीतर मग डोक्याला ताप होतो. तेव्हा हॉटेल बुकिंग करताना कोणत्या रूम बुक करू नये, याची माहिती असू द्या.

लिफ्टजवळील रूम नको रे बाबा

जर तुम्ही हॉटेलची रूम बुक करणार असाल तर लिफ्टजवळील रुम, खोली अजिबात घेऊ नका. बुकिंग करतानाच त्याची दक्षता घ्या. कधीही हॉटेल बुक करताना रूम ही लिफ्टजवळ नसावी. कारण सर्वच जण लिफ्टचा वापर करतात. त्यामुळे येथे सतत वर्दळ तर असतेच पण गोंधळ ही होतो. एकतर तुमची झोप होणार नाही, अथवा तुम्हाला एकांत मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

जास्त रूम बुक करताना ही काळजी घ्या

अनेकदा घरगुती कार्यक्रम अथवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर अशावेळी हॉटेलचे अनेक रूम बुक कराव्या लागतात. अशावेळी ऑनलाईन बुकिंगऐवजी हॉटेलला प्रत्यक्ष जाऊन रूम बुक करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रूम जवळ जवळ आहे की नाही याची खात्री करता येते. तसेच कार्यक्रमाचे स्थळ आणि रूम यामध्ये जास्त अंतर आहे का हे तपासता येते. तसेच स्नॅक्स, आयोजन, रंगसंगती, कार्यक्रमासाठी हॉटेल काय काय सामग्री उपलब्ध करून देणार याची माहिती मिळते. तसेच किती लोकांची व्यवस्था होऊ शकते, याचा अंदाज बांधता येतो.

चौथा मजल्यावर रूम घेताना सावधान

हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर रूम घेताना सुद्धा सावधगिरी बाळगा. कारण एखाद्यावेळी आग लागल्यास निसटण्यास मोठी अडचण येऊ शकते. अग्निशमन दलाला पण अशा ठिकाणी पोहचण्याची कसरत करावी लागते. तेव्हा या मजल्यावर सुद्धा रूम बुक करताना दक्षता घ्या.

पँट्री अथवा रेस्टॉरंटजवळ रूम नको

काही हॉटेलमध्ये पँट्री अथवा रेस्टॉरंटजवळ रूम असतात. अशा रूम घेणे टाळा. कारण या ठिकाणी सतत वर्दळ असते. या ठिकाणचा आवाज, जेवणाचा वास, घमघमाट, ठसका तुम्हाला रूममध्ये सुद्धा असह्य होऊ शकते. अशा रूमध्ये आराम करणे अवघड होऊ शकते.

सकाळी सकाळी हॉटेल बुक केल्यास स्वस्त मिळेल हा भ्रम आहे. सकाळी बुकिंग करण्याऐवजी तुमचा प्लॅन ठरल्यावर लागलीच बुकिंग करा. ऑनलाईन अथवा ॲप्सवर रूम बुक केल्यास डिस्काऊंट अथवा ऑफर मिळते. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.