Post Office Life Insurance | पोस्टाची योजनाच लय भारी, अवघ्या 299 रुपयांत विम्याची जबाबदारी

Postal Insurance News : भारतीय टपाल खाते अगदी स्वस्तात विमा कवच पुरविणार आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

Post Office Life Insurance | पोस्टाची योजनाच लय भारी, अवघ्या 299 रुपयांत विम्याची जबाबदारी
टपाल खात्याचा अवघ्या 299 रुपयात विमा योजना Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 7:17 PM

Post Office Insurance Scheme News : भारतीय टपाल खाते (Indian Post Office) आणि टाटा एआयजी विमा कंपनीने (Tata AIG Insurance Company) विमा क्षेत्रात क्रांतीकारक योजना आणली आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये (Yearly installments) विमाधारकास (Policy Holder) 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतिक्षेत होता. या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासहर्यता उपयोगी पडणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होईल. ही योजना 18 ते 65 वयांतील व्यक्तींसाठी आहे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत (Post Offices) व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीत सामंजस्य करार (Tie Up) करण्यात आला आहे. ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल.

काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत व्यक्तीला अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death), अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.त्याचबरोबर य रुग्णालयाच्या खर्चासाठी (Hospital Expenditure) 10 दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

योजनेचा कालावधी

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.

असा करा अर्ज

तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया चार पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभधारक होऊ शकता.

299 व 399 च्या योजनेतील फरक काय

तशा या दोन्ही योजना सारख्याच आहेत. तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत ही शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसांपर्यंत प्रतिदिन 1 हजार रुपये मिळतील. तसेच 25 हजार रुपये वाहतूक खर्च व मृत्यूनंतर 5 हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल, पण हे 299च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च 25 हजार व अंत्यसंस्कार खर्च 5000 लागू नाहीत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.