Air India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर

ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा समूहाने एअर इंडियातील 100 टक्के हिस्सा 18 हजार कोटी रुपयांना खरेदी केला होता. टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टैलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ही बोली लावण्यात आली होती. एअर इंडियाने पहिल्या टेकऑफसाठी उत्सुक असल्याचे ट्विट केले आहे.

Air India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर
air india
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:36 AM

मुंबई : महाराजा पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी एअर इंडियाची मालकी टाटा समुहाला देण्यात आली. मालकी हक्काची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाने (Air India) टाटा समूहाला(Tata Group) पहिला संदेश ट्विटर हँडलवरुन पाठविला. नव्या मालकासोबत नवीन विमान उड्डाण करण्याची तयारी आहे. एअरलाइन्सने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले. टाटा समुहाचा भाग होताना एअर इंडियासाठी नवीन अध्याय सुरु होत असल्याचे ट्विट कंपनीने केले. हे दोन मोठे ब्रँड एकत्र आले आहेत आणि विशेष प्रवासाला त्यांनी सुरुात केली आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, दोन्ही ब्रँडचा वारसा समृद्ध आहे आणि देशाची सेवा करणे हे आमचे समान ध्येय आहे. ‘टाटा कंपनीचे (Tata Company) स्वागत ‘ असे ट्विट एअरइंडियाने केले आहे. त्याचवेळी टाटा समूहाने एअर इंडियाचे ट्विट रिट्विट करत ‘एअर इंडियासोबत उड्डाण करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे!’ #airindiaonboard

लेटलतिफांना पहिल्याच दिवशी डोस एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराजांची कमान हाती घेताच टाटा समुहाने आपली व्यावसायिक धोरणे स्पष्ट केली आणि लेटलतिफ कर्मचा-यांना दणका दिला. एअर इंडियाची उड्डाणे वेळेत चालावीत, यासाठी टाटा समूहाचा पहिला प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाची प्रतिमा, दृष्टिकोन आणि समज बदलण्याचा प्रयत्न केला जाईल, असा थेट संदेश कर्मचा-यांना देण्यात आला आहे. त्यामुळे लेटलतिफ कर्मचा-यांना सुधारण्याची एक संधी कंपनीने दिली आहे.

सुरुवातीच्या काळात भोजानासह काही निवडक उड्डाणे होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. शुक्रवारी मुंबई-नेवार्क विमान आणि मुंबई-दिल्ली या विमानांमध्ये विशेष जेवण देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केबिन क्रू मेंबर्सना प्रवाशांना पाहुणे म्हणून संबोधित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.क्रू मेंबर्सना चांगली तयारी करण्यास सांगितले गेले आहे आणि तपास अधिकारी विमानतळावरही याची तपासणी करतील. शुक्रवारी सर्व उड्डाणांवर वैमानिकांकडून विशेष स्वागतपर भाषण होणार असून, त्यात एअर इंडिया अधिकृतरीत्या टाटा समूहाचा भाग झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

रतन टाटांचा व्हॉईस रेकॉर्ड सर्व उड्डाणांमध्ये घुमणार

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या सर्व विमानांमध्ये आता रतन टाटा यांचा व्हॉइस रेकॉर्ड वाजविला जाणार आहे. वक्तशीरपणा हे नवीन व्यवस्थापनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि म्हणूनच प्रस्थानाच्या 10 मिनिटे आधी विमानाची दरवाजे बंद केले जातील. ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा समूहाने एअर इंडियातील 100 टक्के हिस्सा 18 हजार कोटी रुपयांना खरेदी केला होता. टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टैलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ही बोली लावण्यात आली होती.

संबंधीत बातम्या : 

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

LIC IPO: एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली?

शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र; सेन्सेंक्स 581, निफ्टी 167 अंकांनी गडगडला

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.