टाटा समूह 5G च्या जगात क्रांती घडवण्याच्या तयारीत, एअरटेलसह मुकेश अंबानींना देणार टक्कर

या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5 जीमध्ये होईल आणि त्यामुळे नोकिया, एरिक्सन आणि हुआवे यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा होऊ शकेल. मुकेश अंबानी यांचीसुद्धा 5G संदर्भात मोठी योजना आहे.

टाटा समूह 5G च्या जगात क्रांती घडवण्याच्या तयारीत, एअरटेलसह मुकेश अंबानींना देणार टक्कर
ratan tata_mukesh ambani
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 1:43 PM

नवी दिल्लीः टाटा ग्रुप 5 जीच्या जगात क्रांती घडविण्याची तयारी करीत आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीच 5 जीसंदर्भात आपला मेगाप्लॅन जाहीर केलाय. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झालाय. टाटा सन्सने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्कमधील नियंत्रक भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केलीय. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5 जीमध्ये होईल आणि त्यामुळे नोकिया, एरिक्सन आणि हुआवे यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा होऊ शकेल. मुकेश अंबानी यांचीसुद्धा 5G संदर्भात मोठी योजना आहे.

देशात फक्त रिलायन्स जिओ 5G सुरू करणार

रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली होती. जिओच्या मदतीने आपण भारत 2G मोफत आणि 5 जी सक्षम बनवणार आहोत. देशात फक्त रिलायन्स जिओ 5G सुरू करेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रगती केलीय, जे वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठं यश आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, 5G चाचण्यांदरम्यान जिओने यशस्वीरित्या 1 Gbps पेक्षा जास्त वेग मिळवलाय. मुकेश अंबानी यांनी जिओच्या ‘मेड इन इंडिया’ सोल्युशनचे वर्णन जागतिक दर्जाचे केलेय. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. जिओचे 5G भारतात यशस्वी होईल, तेव्हा ते जगातील इतर देशांमध्ये देखील निर्यात केले जाणार आहे. अशा प्रकारे भारत 5G विकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनेल.

43.35 टक्के भागभांडवल खरेदी करणार

टाटा सन्स आणि तेजस नेटवर्क करारासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, टाटा सन्सचे एक युनिट Panatone फिन्वेस्ट लिमिटेड तेजस नेटवर्कमधील 43.35 टक्के भाग खरेदी करेल. या करारासंदर्भात तेजस नेटवर्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की टाटा सन्सची (टाटा समूहाची होल्डिंग फर्म) Panatone फिनव्हेस्ट या सहायक कंपनीने करार केलाय. या कराराअंतर्गत कंपनी Panatone ला 1.94 कोटी इक्विटी शेअर्स प्राधान्य तत्त्वावर 258 रुपये प्रति शेअर दराने देणार आहे, त्याची एकूण किंमत 500 कोटी रुपये असेल.

प्राधान्य वाटपाद्वारे खरेदीची योजना

यानंतर आणखी 3.68 कोटी वॉरंटचं प्राधान्यानं वाटप केले जाणार आहे, त्यातील प्रत्येकी एका इक्विटी समभागात 258 रुपये दराने एक शेअर्समध्ये रूपांतरित करता येणार आहे. ज्याची एकूण किंमत 950 कोटी रुपये आहे. पॅंटोनने वॉरंट जारी केल्यापासून 11 महिन्यांच्या आत एक किंवा अनेक टप्प्यात हा पर्याय वापरला जाऊ शकतो, असे निवेदनात म्हटलेय. याव्यतिरिक्त 1.55 कोटी वॉरंटचे प्राधान्याने वाटप देखील केले जाणार आहे, त्यातील प्रत्येकी शेअर्समध्ये प्रति इक्विटी शेअर 258 रुपये दराने रूपांतरित केले जाऊ शकते, त्याची एकूण किंमत 400 कोटी रुपये आहे. वॉरंट जारी झाल्यापासून 18 महिन्यांत हा पर्याय वापरला जाऊ शकतो.

तेजस नेटवर्कमध्ये टाटा सन्सचा हिस्सा 72% पर्यंत

Panatone विशिष्ट व्यवस्थापन कर्मचार्‍यांकडून तेजस नेटवर्कचे 13 लाख इक्विटी शेअर्स मिळवतील. त्यानुसार एकूण इक्विटी समभाग 258 रुपयांपेक्षा जास्त नसेल. एकूण 34 कोटी रुपये होती. त्यानंतर Panatone आणि टाटा समूहाच्या काही कंपन्या सेबीच्या अधिग्रहणाच्या नियमांनुसार तेजस नेटवर्कच्या 4.03 कोटी इक्विटी शेअर्सच्या संपादनासाठी खुली ऑफर देतील. काही वर्षांत जेव्हा हा करार पूर्ण होईल, तेव्हा तेजस नेटवर्कमधील टाटा सन्सचा हिस्सा 72 टक्क्यांपर्यंत वाढेल.

TCS आणि Airtelने स्वदेशी 5 जी तंत्रज्ञानासाठी मिळवला हात

टाटा ग्रुपची तयारी ही 5 जीच्या जगात क्रांती करण्याची आहे. विशेषतः हे काम टीसीएसच्या मदतीने केले जाणार आहे, तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात जेव्हा भारती एअरटेल आणि टाटा समूह कंपनी TCS यांनी संयुक्तपणे भारतातील 5G ​​नेटवर्किंगसाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्या स्वदेशी 5G तंत्रज्ञानावर एकत्र काम करत आहेत. एअरटेल जानेवारी 2022 पर्यंत 5G साठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची तयारी करत आहे.

PLI योजनेसाठी अर्ज

टाटा समूह भारतात 5G साठी पूर्ण तयारी करीत आहे. एंटरप्राइझ विभागात स्वत: साठी असलेली संधी गमावू इच्छित नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, तेजस आणि टाटा सन्सकडून पीएलआय योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्याबाबत अर्जही दाखल करण्यात आलेत. तेजस स्थापनेचा उद्देश दूरसंचार कंपन्यांना उपकरणे पुरविणे हा होता.

संबंधित बातम्या

सचिन तेंडुलकरकडून ‘या’ कंपनीत 15 कोटींची गुंतवणूक, पूनावालांकडेही कंपनीचे शेअर्स

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने स्वस्त, खरेदीची सुवर्णसंधी, झटपट तपासा

Tata Group ready to revolutionize 5G world, clash with Airtel, Mukesh Ambani

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.