AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Technologies : गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी! टाटा ग्रूपचा IPO लवकरच बाजारात

Tata Technologies : टाटा समूह गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळवून देत आहे.

Tata Technologies : गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी! टाटा ग्रूपचा IPO लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांचा समूह लवकरच फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) घेऊन येत आहे. तर दुसरीकडे टाटा समूह पण गुंतवणूकदारांना (Investors) कमाईची संधी देणार आहे. जवळपास 18 वर्षानंतर टाटा समूहाची ही कंपनी आयपीओ (IPO) बाजारात दमदार प्रवेश करणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजने (Tata Technologies) त्यासाठी एका सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.

या विषयीच्या अहवालात, टाटा समूह, टाटा टेक्नॉलॉजीजमार्फत आयपीओ बाजारात आणेल. या माध्यमातून कंपनी बाजारातून जवळपास 4000 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाचा इतिहास पाहता गुंतवणूकदारांना फायदाच झाला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये टेक्नॉलॉजीजची मुख्य कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आयपीओद्वारा टेक्नॉलॉजीजमध्ये हिस्सा विक्रीला मंजूरी दिली होती. योग्य वेळी, चांगली परिस्थिती आणि नियामकाच्या मान्यतेनंतर टाटा टेकचा आयपीओ बाजारात आणणार असल्याचा दावा त्यावेळी समूहाने केला होता.

हे सुद्धा वाचा

टाटा समूह 18 वर्षांपासून आयपीओ बाजारापासून दूर आहे. वर्ष 2004 नंतर समूहातील कोणत्याही कंपनीने आयपीओ आणला नव्हता. दीर्घ कालावधीनंतर कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. आयपीओ बाजारात जोरदार एंट्रीसाठी कंपनीने कंबर कसली आहे.

आयपीओ बाजारात आणण्यासाठीची सर्व कवायत पूर्ण झाली असून याविषयीची तारीख आणि इतर महत्वपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल. रतन टाटा समूहाचे संचालक होते, तेव्हा आयपीओ आला होता. आता टाटा सन्सचे सध्याचे संचलाक एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात ग्रुपचा पहिला आयपीओ येणार आहे.

टाटा सन्सचे संचालक म्हणून एन. चंद्रशेखरन 2017 पासून जबाबदारी संभाळत आहेत. अहवालानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ (Tata Technologies IPO) या वर्षाच्या 2023 च्या शेवटी अथवा 2024 मध्ये कोणत्याही वेळी बाजारात दाखल होऊ शकतो.

टाटा समूहाच्या एकूण 100 उपकंपन्या आहेत. तर शेअर बाजारात त्यातील केवळ 29 कंपन्या सूचीबद्ध आहेत. टाटा टेकमध्ये टाटा मोटर्सची 74.42 टक्के वाटा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज एक ग्लोबल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिजिटल सर्व्हिस फर्म आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.