जुनं तेच सोनं! 100 रुपयांची बचत आज 2.67 कोटींवर, TATA ग्रुपच्या जुन्या स्कीमचा कमाल
असं म्हणतात ‘जुनं ते सोनं’ असाच काहीसा अनुभव TATA ग्रुपच्या एका जुन्या स्कीमने ग्राहकांना दिला आहे. TATA म्युच्युअल फंडातील सर्वात जुनी इक्विटी योजना टाटा लार्ज अँड मिडकॅप फंड गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थानं सोनं ठरली आहे. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.
कोणत्याही गोष्टींचे किंवा गुंतवणुकीचे परिणाम लगेच दिसत नाही. थेंब थेंब तळे साचे, असं अगदी साधं उदाहरण देता येईल. आज तुम्ही एक छोटी रक्कम बचत करायला सुरुवात केली तर भविष्यात तुम्हाला ती रक्कम मोठी झालेली दिसेल. अशीच टाटा म्युच्युअल फंडातील सर्वात जुनी इक्विटी योजना टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने सोनं ठरली आहे.
TATA ग्रुपच्या हा फंड 31 वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे आणि उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या फंडाने एक लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे रूपांतर 47 लाख रुपयांत केले आहे.
सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुम्ही या फंडात हा फंड सुरु झाल्यापासून दरमहा 3 हजार रुपयांची SIP केली असती तर तुमच्याकडे आता जवळपास 2 कोटी 67 लाख रुपयांचा फंड असता. टाटा लार्ज अँड मिडकॅप फंड ही प्रामुख्याने लार्जकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी योजना आहे.
SIP रिटर्न किती?
टाटा लार्ज आणि मिडकॅप फंडातील SIP चे आकडे 31 वर्षे जुने आहेत. या फंडात जर तुम्ही सुरुवातीपासून मासिक 3 हजार रुपये म्हणजेच रोज 100 रुपयांपर्यंत SIP केली असती तर त्याचे एकूण मूल्य 2 कोटी 67 लाख 12 हजार 105 रुपये असते. म्हणजेच या फंडाने 31 वर्षांत SIP असणाऱ्यांना 16.49 टक्के वार्षिक परतावा मिळाला असता. यावरुन हे लक्षात येईल की गुंतवणूक योग्य ठिकाणी किती महत्त्वाची आहे.
कमी गुंतवणूक अधिक फायदा
31 वर्षात SIP परतावा: 16.49 टक्के वार्षिक मासिक SIP रक्कम: 3000 रुपये 31 वर्षात एकूण गुंतवणूक: 11 लाख 16 हजार रुपये 31 वर्षात SIP चे एकूण मूल्य: 2 कोटी 67 लाख 12 हजार 105 रुपये
टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड: एकरकमी परतावा
1 वर्षाचा परतावा: 24.50 टक्के 3 वर्षांचा परतावा: 15.48 टक्के वार्षिक परतावा 18.84 टक्के वार्षिकनुसार 7 वर्षांचा परतावा: 14.90 टक्के वार्षिक
लाँचिंगवेळी 10 हजार गुंतवणुकीचे आजचे मूल्य: 4 लाख 70 हजार 768 रुपये लाँचिंगवेळी 1 लाख गुंतवणुकीचे आजचे मूल्य: 47 लाख 7 हजार 680 रुपये
लार्ज आणि मिडकॅप फंड म्हणजे काय?
नावाप्रमाणेच लार्ज आणि मिडकॅप फंड लार्ज कॅप शेअर्स आणि मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. यामुळे गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओला स्थैर्य मिळू शकते आणि चांगली वाढ होऊ शकते. लार्जकॅप शेअर्स पोर्टफोलिओला स्थैर्य देतात, तर बाजार वाढल्यावर मिडकॅप जास्त परतावा देऊ शकतात.
लार्ज आणि मिडकॅप फंडांचा फोकस 250 कंपन्यांच्या शेअर्सवर असतो. त्यापैकी मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत टॉप 100 कंपन्या लार्जकॅपअंतर्गत येतात, तर पुढील 150 कंपन्या मिडकॅपअंतर्गत येतात.