AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Story: जेव्हा इंग्रजांनी भारतीयांना त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, जमशेदजी टाटांनी थेट TAJ उभारलं!

समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे हॉटेल मुंबईचा अभिमान आहे, हे पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात. ताज हॉटेलचा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आदरातिथ्य अनुभवलाय, त्यांनी नेहमी एकदा तरी भेट देण्यास इतरांना सांगितलंय.

Tata Story: जेव्हा इंग्रजांनी भारतीयांना त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, जमशेदजी टाटांनी थेट TAJ उभारलं!
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 7:46 AM

मुंबईः हॉटेल ताज (TAJ) ज्यात राहणे, खाणे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. अशाच या मुंबईतील ताजमहाल हॉटेलच्या सौंदर्याची जगभरात चर्चा असते. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे हॉटेल मुंबईचा अभिमान आहे, हे पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात. ताज हॉटेलचा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आदरातिथ्य अनुभवलाय, त्यांनी नेहमी एकदा तरी भेट देण्यास इतरांना सांगितलंय. विशेषतः दक्षिण आशियातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) द्वारे ऑफर केलेले जगातील हे सर्वात आलिशान हॉटेल आहे.

जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड म्हणून स्थान

अलीकडेच ताज हॉटेल्सची गुणवत्ता आणि आदरातिथ्य आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले गेलेय, कारण ताजला ब्रँड फायनान्सने जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड म्हणून स्थान दिले. पण भारतातील आयकॉनिक हॉटेलच्या पायाभरणीचे खरे कारण आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नसावे.

बदलाची कथा म्हणजे “हॉटेल ताज”

जमशेदजी टाटा (JRD Tata) यांनी या हॉटेलची पायाभरणी केली होती. एकदा ब्रिटिश काळात त्यांना तेथील भव्य हॉटेल्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की, ते फक्त ‘गोऱ्या’ लोकांसाठी मर्यादित होते, म्हणजे फक्त ब्रिटिशच प्रवेश करू शकत होते. जमशेटजी टाटा यांनी हा संपूर्ण भारतीयांचा अपमान मानला आणि मग त्यांनी ठरवले की, ते एक हॉटेल बांधतील, जिथे केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी लोकही कोणत्याही निर्बंधाशिवाय राहू शकतील. यानंतरच त्यांनी लक्झरी हॉटेल ताजचा पाया घातला आणि अशा प्रकारे भारतातील पहिले सुपर लक्झरी हॉटेल अस्तित्वात आले. सध्या ताज हे जगभरातील आकर्षणाचे केंद्र आहे.

ताज 20 व्या शतकात बांधले गेले

समुद्राच्या काठावर वसलेला ताजमहाल पॅलेस म्हणजे ताज हॉटेल मुंबईसाठी हिऱ्यासारखा आहे. जे या शहराच्या सौंदर्यात भर घालते. ताजची पायाभरणी टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी 1898 मध्ये केली. 31 मार्च 1911 रोजी गेटवे ऑफ इंडियाची स्थापना होण्याआधीच हॉटेलने 16 डिसेंबर 1902 रोजी प्रथमच पाहुण्यांसाठी दरवाजे उघडले. ताजमहाल पॅलेस ही मुंबईतील पहिली इमारत होती, प्रकाशानं उजळून निघालेली होती. हॉटेलमध्ये दोन स्वतंत्र इमारती बनवण्यात आल्यात. ताजमहाल पॅलेस आणि टॉवर असे ते आहेत, जे ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राने एकमेकांपासून वेगळे आहेत. ताजमहाल पॅलेस विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आला, तर टॉवर 1973 मध्ये उघडण्यात आला.

पहिल्या महायुद्धापासून मुंबईच्या हल्ल्यापर्यंतचा साक्षीदार

हॉटेलचा प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित इतिहास आहे, ज्यात अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची दुसरी पत्नी रतनबाई पेटीट 1929 मध्ये तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये ताज हॉटेलमध्ये राहत होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात 600 खाटांच्या हॉटेलचे लष्करी रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. हे ब्रिटिश राज्याच्या काळापासून पूर्वेतील सर्वोत्तम हॉटेल्सपैकी एक मानले जाते. 2008 च्या मुंबई हल्ल्यांतही हे हॉटेल केंद्रस्थानी होते.

जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड

2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर ताज हॉटेलनं अनेक चढ-उतार पाहूनही, ताज लक्झरी हॉटेल साखळीने ब्रँड फायनान्सच्या ‘ग्लोबल ब्रँड इक्विटी मॉनिटर’ वर विशेषतः भारताच्या घरगुती बाजारपेठेत चांगलेच नाव कमावले.

संबंधित बातम्या

तुमच्याकडेही एअरटेल सिम असल्यास मिळणार 4 लाखांचा लाभ, जाणून घ्या कसा?

खूशखबर! सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार, कोणत्याही पत्त्यावर घेता येणार, नियम काय?

Tata Story: When the British refused to allow Indians to enter their hotel, Jamshedji Tata set up a live TAJ!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.