एका दिवसात देतो 22 अंडे, लाखोंची होते कमाई; पण पाळण्यासाठी घ्यावा लागतो परवाना
कमी भांडवल गुंतवून जास्त नफा कमवायचा असेल तर हा व्यवसाय करता येऊ शकतो. पण त्यासाठी सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.
मुंबई : भारतात कुक्कुटपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. अंडी ही भारतात मोठ्या प्रमाणात आहारात करतात. त्यामुळेच अंड्यांचा व्यवसाय हा चांगली कमाई करुन देतो. पण यासोबतच तितर पालन देखील खूप लोकप्रिय होत आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तो झपाट्याने लोकप्रिय होत आहे. तितर हा जंगली पक्षी आहे. पण त्याची शिकार करुन ते खाल्ले देखील जाते. यामुळेच तितर हा पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत सरकारने परवान्याशिवाय तितरची शिकार आणि संगोपनावर बंदी घातली आहे. तितर पाळायचे असेल तर सरकारकडून परवाना घ्यावा लागतो.
पाळण्यासाठी लागतो परवाना
परवाना नसेल तर हा पक्षी पाळता येत नाही. एका दिवसात तो जवळपास २२ अंडी घालू शकतो. कोंबडी पालन पेक्षा हा व्यवसाय अधिक कमाई करुन देतो. कारण या पक्ष्याच्या अंडींची किंमत कोंबडीच्या अंडींपेक्षा अधिक असते.
300 अंडी घालण्याची क्षमता
तीतर एका वर्षात एकूण 300 अंडी घालण्यास सक्षम आहे. हा पक्षी जन्मानंतर 40 ते 45 दिवसांत अंडी घालतो. जन्मानंतर त्याचे वजन 30 ते 35 दिवसांत 180 ते 200 ग्रॅम होते. तितरला बाजारात खूप मागणी आहे. त्यामुळेच ते चांगल्या दरात विकले जातात. यातून मोठा नफा कमवला जातो.
कमी भांडवल जास्त मुनाफा
या पक्ष्याच्या संगोपनासाठी जास्त भांडवल गुंतवावे लागत नाही. या पक्ष्याची अंडी बाजारात वाजवी दरात विकली जातात. त्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या आजारांमध्ये त्याच्या अंड्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
तितर नामशेष होण्याच्या मार्गावर
तितर हा एक पक्षी आहे जो झपाट्याने नामशेष होत आहे. त्यामुळेच सरकारने त्याच्या शिकारीवर बंदी घातली आहे. ज्यांना तितर पालनाची आवड आहे किंवा त्यांना त्याचा व्यवसाय करायचा आहे, ते यासाठी सरकारकडून परवाना घेतात. जर तुम्ही परवान्याशिवाय तितर पाळत असाल तर तो कायदेशीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते.