तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

उन्हाळा वाढतो आहे (Rising temperature), एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. आजून मे महिना बाकी आहे. मात्र एप्रिल महिन्यातच वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसीच्या (AC demand) मागणीमध्ये अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे.

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:18 PM

उन्हाळा वाढतो आहे (Rising temperature), एप्रिल महिन्यातच तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. आजून मे महिना बाकी आहे. मात्र एप्रिल महिन्यातच वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसीच्या (AC demand) मागणीमध्ये अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेष: वाढत्या उन्हाचा मोठा फटका हा पश्चिम भारताला बसत आहे. वाढत्या तापमानापासून वाचण्यासाठी नागरिक एसीची खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये एसीची रेकॉर्ड तोड विक्री झाली आहे. एप्रिल (April) महिन्याच्या शेवटी एसीच्या विक्रीचा आकडा 15 लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. एसीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या पॅनासोनिक, व्होल्टास, एलजी आणि लॉयड सारख्या कंपन्यांना चालू वर्षात मोठ्या प्रमाणात एसीची विक्री होईल असा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात सर्व उद्योगधंदे ठप्प होते. मात्र यंदा एसीच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

95 लाख एसी विक्रीची अपेक्षा

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पॅनासोनिक कंपनीचे दक्षिण अशियाचे प्रमुख मनीष शर्मा यांनी म्हटले आहे की, कोरोना पूर्व काळात 2019 मध्ये एका वर्षात एकूण 75 लाख एसींची विक्री झाली होती. मात्र गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट होते. कोरोना काळात लावण्यात आलेला लॉकडाऊनचा मोठा फटका हा कंपन्यांना बसला. गेले दोन वर्ष एसची मागणी अतिशय अल्प होती. मात्र आता कोरोना संकट देखील संपले आहे आणि गरमी वाढत असल्याने एसीची मागणी वाढली आहे. या वर्षभरात 92 लाख ते 95 लाख एसीची विक्री होईल असा आमचा अंदाज आहे.

‘या’ राज्यात एसीला मागणी

सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, सुर्य आग ओकतोय. गरमी वाढल्याने देशातील प्रत्येक राज्यातून एसी, कूलर, फॅन यासारख्या थंडावा निर्माण करणाऱ्या उपकरणांना मागणी आहे. मात्र त्यामध्ये देखील उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत बोलताना हॅवल्सचे अध्यक्ष रविंद्र जुत्सी यांनी बोलताना सांगितले की, यंदा एसीला मोठी मागणी असून, चालू वर्षात आतापर्यंत कंपनीने एकूण 2.5 लाख यूनिट एसीची विक्री केली आहे.

संबंधित बातम्या

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

केंद्र सरकारचा मसुदा : गृहनिर्माण क्षेत्रात दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे अनिवार्य

Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.