‘या’ 5 क्रेडिट कार्डांवर सर्वोत्तम कॅशबॅक, तुम्हीसुद्धा फायदा घेऊ शकता
या क्रेडिट कार्डमध्ये प्राईम सदस्यांसाठी Amazon वर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. यासोबत अॅमेझॉनवर नॉन-प्राइम मेंबर्स 3 टक्के कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. या कार्डद्वारे 100 हून अधिक Amazon भागीदार विक्रेत्यांना 2 टक्के कॅशबॅक आणि इतर व्यवहारांवर एक टक्के कॅशबॅक मिळतो. हे आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे.
नवी दिल्लीः Best Cashback on Credit Cards: बाजारात अनेक क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत, जे विविध प्रकारच्या खरेदीदारांच्या गरजेनुसार बनवण्यात आलेले आहेत. क्रेडिट कार्ड वापरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या खर्चाच्या पद्धती आणि जीवनशैलीनुसार योग्य असे क्रेडिट कार्ड मिळते. तुम्ही नियमितपणे ऑनलाईन खरेदी केल्यास तुम्ही उत्तम ऑनलाईन शॉपिंग फायद्यांसह कार्ड मिळवू शकता. या फायद्यांमध्ये कॅशबॅकचा समावेश आहे.
कॅशबॅक हे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक
क्रेडिट कार्ड निवडताना कॅशबॅक हे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक आहे. तुम्ही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCGs) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या अनेक आकर्षक कॅशबॅक योजनांचा लाभ घेऊ शकता. जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वारंवार खरेदी करतात, त्यांच्यासाठी क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक फायदेशीर आहे. कॅशबॅकमुळे मोठी बचत होऊ शकते. अशा पाच क्रेडिट कार्डांवर एक नजर टाकूया, जी सर्वोत्तम कॅशबॅक योजनांसह येतात.
Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड
या क्रेडिट कार्डमध्ये प्राईम सदस्यांसाठी Amazon वर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. यासोबत अॅमेझॉनवर नॉन-प्राइम मेंबर्स 3 टक्के कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. या कार्डद्वारे 100 हून अधिक Amazon भागीदार विक्रेत्यांना 2 टक्के कॅशबॅक आणि इतर व्यवहारांवर एक टक्के कॅशबॅक मिळतो. हे आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे.
Axis Bank Ace क्रेडिट कार्ड
हे क्रेडिट कार्ड Google Pay रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक, Big Basket आणि Grofers वर 5 टक्के कॅशबॅक, Swiggy, Zomato, Ola वर 4 टक्के, इतर सर्व खर्चांवर 2 टक्के फ्लॅट कॅशबॅक देते. या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क 499 रुपये आहे.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड
हे क्रेडिट कार्ड Flipkart, Myntra आणि 2GUD वर 5 टक्के कॅशबॅक, निवडक विक्रेत्यांवर 4 टक्के आणि इतर श्रेणींमध्ये 1.5 टक्के कॅशबॅक देते. या क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.
HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड
या क्रेडिट कार्डसह सर्व ऑनलाईन खर्चावर 1.5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. इतर खर्चांवर 1% कॅशबॅक आहे. तुम्ही सूचीबद्ध विक्रेत्यांसह EMI व्यवहारांवर कॅशबॅक मिळवू शकता. या क्रेडिट कार्डवर वार्षिक 750 रुपये शुल्क आहे.
एचडीएफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड
या क्रेडिट कार्डमध्ये Amazon आणि Flipkart वर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. यासह PayZapp आणि स्मार्ट बायद्वारे फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर 5% कॅशबॅक, ऑफलाईन खर्च आणि वॉलेट रिलोडवर 1% कॅशबॅक आहे. या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क एक हजार रुपये आहे.
संबंधित बातम्या
1 घर विकून तुम्ही अनेक मालमत्ता खरेदी करू शकता? आयकर नियम काय सांगतो?
कार खरेदीसाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते, 10 लाखांवर किती EMI?