क्रिप्टोकरन्सी बिल अंतिम टप्प्यात, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार
क्रिप्टोकरन्सी बिलाला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर लवकरच हे बिल केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना क्रिप्टोकरन्सी बिलाला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर लवकरच हे बिल केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 2018 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रिप्टोकरन्सीशी संबंधित देवाणघेवाण बँकांना प्रतिंबंधित केलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे निर्बंध हटवले होते.(The cryptocurrency bill is in the final stages)
देशात क्रिप्टोकरन्सीसाठी कायदा नाही. अशावेळी सरकार क्रिप्टोकरन्सीवर वेगळा कायदा करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने 17 व्या लोकसभेतील अर्थसंकल्पात एक बिल सूचीबद्ध केलं होतं. त्यात भारताच्या सर्व खासगी क्रिप्टोकरन्सी जसे बिटकॉईन (Bitcoin), ईथर (Ether), रिपल (Ripple)ला निर्बंध लादण्याचा प्रस्ताव आहे.
क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध का?
25 जानेवारीच्या बुकलेटमध्ये RBIने म्हटलं होतं की, सरकार क्रिप्टोकरन्सी आणि त्यासह येणाऱ्या रिस्कबाबत सावध आहे. पण सध्यस्थितीत करन्सीच्या डिजिटलायझेशनच्या पर्यायाबाबद विचार सुरु आहे. क्रिप्टोकरन्सी एक विकेंद्रीत बचत प्रणाली आहे. म्हणजे पारंपरिक मुद्रानुसार कोणत्याही केंद्रीय बँकेकडून ती रेग्युलेट केली जाऊ शकत नाही. यामुळे आरबीआयसारख्या केंद्रीय बँकांसाठी ही चिंतेची बाब आहे. आरबीआयकडून युरोपियन सेंट्रल बँकेलाही क्रिप्टोकरन्सीबाबत चेतावणी देण्यात आली आहे.
क्रप्टोकरन्सी किती प्रकाराची?
डिजिटील किंवा क्रिप्टोकरन्सी इंटरनेटवर चालणारी एख व्हर्च्युअल करन्सी आहे. बिटकॉईनसह जगभरात अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत. त्यात रेड कॉईन, सिया कॉईन, सिस्कॉईन, व्हॉईस कॉईन आणि मोनरो यांचा समावेश आहे.
कोरोना काळात मोठी कमाई
कोरोना काळामध्ये बिटकाईनने त्यांचे कमाईचे रेकॉर्डस मोडले आहेत. बिटकाईन ही ऑनलाईन स्वरुपातील क्रिप्टोकरन्सी आहे. कोरोना काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या बिटकॉईननं कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये मोठी झेप घेतली. इंटरनेटवर बिटकॉईन सारख्या अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत. जगामध्ये सध्या 1500 क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. सोशल मीडिया कंपनी फेसबूकने काही दिवसांपूर्वी लिब्रा या नावाची क्रिप्टोकरन्सी घोषित केली होती. बिटकाईन एथरियम आणि लिब्रा यांच्यापेक्षा वेगानं वाढत आहे.
एका बिटकॉईनची किमंत पहिल्यांदा 20 हजार डॉलरच्या वर पोहोचली. बिटकॉईनच्या किमंतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये 213 टक्के वाढ झाली आहे. 17 डिसेंबर 2019 ला एका बिटकाईनची किंमत 6 हजार 641 डॉलर होती. एका वर्षानंतर म्हणजेच 16 डिसेंबर 2020 ला एका बिटकॉईनची रक्कम 20 हजार 791 डॉलरवर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत
Bitcoin: बिटकॉईन ट्रेडिंगवर GST लागणार?, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
The cryptocurrency bill is in the final stages