सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही: पीयूष गोयल
तत्पूर्वी एका ट्विटमध्ये डीआयपीएएम सेक्रेटरीने टाटा समूहाची एअर इंडियासाठी बोली मंजूर झाल्याचा दावा करणारा मीडिया रिपोर्ट फेटाळून लावला होता. पीयूष गोयल यांनी सांगितले की, विमान कंपनीच्या अधिग्रहणासाठी अंतिम विजेत्याची निवड विहित प्रक्रियेद्वारे केली जाईल.
नवी दिल्लीः एअर इंडियासाठी आर्थिक बोली पूर्ण झालीय. मात्र, नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, टाटा सन्सच्या बोलीला मंजुरी मिळाल्याचा दावा अनेक प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी किमान राखीव किंमतीपेक्षा 3000 कोटी अधिक बोली लावली. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी हे वृत्त फेटाळले. ते म्हणाले की, सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
टाटा समूहाची एअर इंडियासाठी बोली मंजूर
तत्पूर्वी एका ट्विटमध्ये डीआयपीएएम सेक्रेटरीने टाटा समूहाची एअर इंडियासाठी बोली मंजूर झाल्याचा दावा करणारा मीडिया रिपोर्ट फेटाळून लावला होता. पीयूष गोयल यांनी सांगितले की, विमान कंपनीच्या अधिग्रहणासाठी अंतिम विजेत्याची निवड विहित प्रक्रियेद्वारे केली जाईल. ते म्हणाले, “मी दुबईत आहे आणि मला असे वाटत नाही की असा कोणताही निर्णय घेण्यात आलाय. अर्थातच बोली आमंत्रित करण्यात आली होती आणि याचे मूल्यांकन अधिकाऱ्यांद्वारे आणि योग्य वेळी केले जाते. यासाठी एक पूर्णपणे निर्धारित प्रक्रिया आहे, ज्याद्वारे अंतिम विजेता निवडला जाईल.
पहिल्यांदा DIPAM सचिवांनीही अहवाल नाकारला
टाटा कर्जबाजारी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सर्वोच्च निविदाकार म्हणून उदयास आल्याच्या माध्यमांच्या अहवालांवर ते प्रतिक्रिया देत होते. सरकारच्या वतीने खासगीकरण हाताळणारे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी शुक्रवारी एक ट्विट केले, ट्विटमध्ये ते म्हणाले, केंद्राने अद्याप एअर इंडियासाठी कोणतीही आर्थिक बोली मंजूर केलेली नाही. त्यांनी ट्विट केले की, “एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या बाबतीत भारत सरकारने आर्थिक निविदा मंजूर केल्याचा मीडिया अहवाल चुकीचा आहे. सरकारच्या निर्णयाबद्दल माध्यमांना माहिती दिली जाईल. ”
दागिने, फार्मा व्यवसायात यूएईसोबत संधी
यूएईसोबत प्रस्तावित मुक्त व्यापार करार (एफटीए) बद्दल विचारले असता ते म्हणाले की, भारतीय उद्योगपतींसाठी कापड, रत्ने आणि दागिने, फार्मा आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. ते म्हणाले की, वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. गुंतवणुकीबाबत ते म्हणाले, “आम्हाला भारतीय व्यवसायांना यूएईशी संलग्न होण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल.”
संबंधित बातम्या
सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA दसऱ्यापूर्वी 3 टक्क्यांनी वाढणार, आता पगार किती होणार?