ITR Form : करदात्यांसाठी केंद्र सरकारने दिले हे संकेत, आगामी अर्थसंकल्पात ITR Form मध्ये होईल हा बदल

ITR Form : नवीन आर्थिक वर्षात ITR अर्जात बदल होण्याची शक्यता आहे..

ITR Form : करदात्यांसाठी केंद्र सरकारने दिले हे संकेत, आगामी अर्थसंकल्पात ITR Form मध्ये होईल हा बदल
नवीन वर्षात नवीन बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 6:46 PM

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात (Fiscal Year) केंद्र सरकारच्या कर वसुलीत 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार आता कर प्रणाली अजून सुटसूटीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात अनेक बदल सुचविण्यात आले होते. ते बदल नवीन वर्षात दिसून येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार प्राप्तिकर रिटर्नमध्ये बदल करणार आहे. हा अर्ज सहज सोपा करण्यात येणार आहे. त्यासाठी ITR Form मध्ये मोठा बदल (Tax Regime Reforms) करण्यात येणार आहे.

PTI च्या वृत्तानुसार, केंद्र सरकार प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करताना जो अर्ज आहे, त्याची संख्या कमी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची कागदी घोडे नाचविण्याच्या संकटातून सूटका होईल. तसेच रिटर्न दाखल करण्यासाठी लागणाऱ्या वेळातही कपात होईल.

कोविडनंतरच्या काळात केंद्र सरकारने कर चोरी रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा केंद्र सरकारची गंगाजळी वाढण्यात झाला. 2022 मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणात जमा झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. त्यामुळे केंद्र सरकार आता कर व्यवस्था सुधारण्याची योजना आखली आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या काही दिवसात केंद्र सरकार कर चोरी रोखण्यासाठी व्यापक ड्राईव्ह आणू शकते. त्यासाठी कठोर उपाय योजना करु शकते. तसेच कराचा परीघही वाढवू शकते. ऑनलाईन गेमिंग, ई-कॉमर्स आणि इतर ऑनलाईन सेवा पुरवठादारांवर कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे कर संकलनात वाढ होण्याची आशा आहे.

पुढील वर्षात भारत G20 देशाच्या शिखर बैठकीचे नेतृत्व करत आहे. तर देशात डिजिटल अर्थव्यवस्थेचा बिगूल वाजलाच नसून तिचा झपाट्याने विस्तार ही झाला आहे. त्यामुळे G20 देशांच्या अजेंड्यावर कर प्रणाली, करांची वसुली, क्रिप्टोकरन्सीवर कर या मुद्यांचा ऊहापोह होऊ शकतो.

एक वर्षांपेक्षा अधिक काळ होल्डिंग करुन ठेवलेल्या शेअरवर केंद्र सरकार कर लावण्याचा विचार करु शकते. शेअरवर कॅपिटल गेन कर 10 टक्के लागण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन भांडवली गुंतवणुकीवर कर लागण्याची शक्यता आहे. डेब्ट इन्स्ट्रुमेंट आणि दागिन्यांवर 20 टक्के कर लागण्याची शक्यता आहे.

नवीन वर्षांत व्यक्तिगत करदात्यांना मोठा फायदा देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळे कर रचनेत बदल होऊ शकतो. सध्याची कर मर्यादेत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. करदात्यांना मोठी कर सवलत देण्याचा विचार सुरु आहे.

प्राप्तिकर अधिकारी सध्या करदात्यांना एक सर्वमान्य आयटीआर फॉर्म देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची कटकट कमी होऊन कर भरण्यासाठी करदाते प्रोत्साहित होतील. त्यांना कर भरण्यासाठी कागदी झंझट करावी लागणार नाही. व्यक्तिगत करदात्यांना आईटीआर-1 आणि 4 मिळून एक फॉर्म देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.