Cost Cutting: अमेरिकेत मंदीने हजारो तंत्रज्ञांचे रोजगार हिसकावले;  भारतीय स्टार्टअप्सचा निधी आटला, आता आपल्याकडेही हजारोंवर बेरोजगारीची कु-हाड?

Startup Cost Cutting: अमेरिकेत मंदीच्या भीतीने हजारो तंत्रज्ञान बेरोजगार झाले आहे. भारतीय स्टार्टअप्सचा ही निधी आटत असल्याने आपल्याकडे ही हजारो जणांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Crunchbase या संस्थेना हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Cost Cutting: अमेरिकेत मंदीने हजारो तंत्रज्ञांचे रोजगार हिसकावले;  भारतीय स्टार्टअप्सचा निधी आटला, आता आपल्याकडेही हजारोंवर बेरोजगारीची कु-हाड?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:51 PM

अवघ्या दोन वर्षात संपूर्ण जगभरात नव उद्योगांनी (Startups)आणि उद्योजकांनी नवउमेदीने नवीन कल्पनांसह उंच भरारी घेतली होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या संस्थांनी अवघ्या एक दोन वर्षांतच कोट्यवधीच नाही तर अब्जावधींची उलाढाल (Turnover) पाहली. त्यांनी कर्मचा-यांची भरती केली आणि अनेक आकडी वेतन ही दिले. पंरतू, कोरोना काळात(covid-19 Period) सुरु झालेल्या या उद्योगांनी अद्याप बाळसेही धरलेले नसताना त्यांच्या जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अमेरिकेतील मंदीच्या (American Recession) फे-याने या उद्योगांना येणारा पतपुरवठा आटला आहे. त्यामुळे या उद्योगांना बिझनेस (Business) आणि पतपुरवठा(Economic Support) या दोन्ही आघाड्यावर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अमेरिकेत मंदीच्या भीतीने हजारो तंत्रज्ञान बेरोजगार झाले आहे. तिथे या कुशल कामगारांपुढे आता जगण्याचा मोठा प्रश्न आहे. तर कंपन्यांना त्यांचा डोलारा सांभाळायचा आहे. भारतीय स्टार्टअप्सचा ही निधी आटत असल्याने आपल्याकडे ही हजारो जणांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Crunchbase या संस्थेना हा अहवाल प्रसिद्ध केल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.

हजारो कुशल मनुष्यबळ घरी

टेक आणि स्टार्टअप क्षेत्रातील सुमारे 22,000 कामगार, भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील 12,000 हून अधिक कामगारांनी यावर्षी नोकऱ्या गमावल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात स्टार्टअप फोफावले होते. त्यांना त्या वातावरणाचा चांगला फायदा मिळाला. पण आता त्यांना आर्थिक मंदीमुळे दबाव जाणवत आहे, क्रंचबेसच्या (Crunchbase) अहवालानुसार स्टार्टअप्सना निधी उभारणे अधिक कठीण जात आहे. या कंपन्यांचे बाजारातील मूल्यांकनही घटले आहे. Ola, unacademy, Vedantu, Cars24 आणि Mobile Premier League (MPL) सारख्या अनेक युनिकॉर्न कंपन्यांनी पुनर्रचना आणि खर्चात कपातीच्या नावाखाली अनेक कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तर Blinkit, BYJU’s (White Hat Jr, Toppr), FarEye, Trell सारख्या कंपन्यांनी यंदा अनेकांना नोक-यांहून काढले आहे. उदयोन्मुख क्षेत्रातील या नोकर कपातीचा परिणाम आर्थिक परिचलनावर होऊन सरकारची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

60,000 नोक-या जाणार

क्रंचबेसच्या (Crunchbase) अहवालानुसार, भारतीय स्टार्टअप क्षेत्राला सध्या निधीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी 2022 मध्ये किमान 50,000 स्टार्टअप कर्मचार्‍यांना “पुनर्रचना आणि खर्च कपात” च्या नावाखाली काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स, वित्तीय सेवा कंपनी रॉबिनहूड आणि अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्म यांसारख्या जागतिक कंपन्यांही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहेत. या क्षेत्रात काम करणा-या हजारो कर्मचा-यांना दुसरी नोकरी शोधण्याची गरज पडू शकते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.