Adani Aurangabad : गौतम अदानी यांचे औरंगाबाद कनेक्शन काय? कोणती केली नवीन कंपनी स्थापन, काय करेल काम

Adani Aurangabad : गौतम अदानी आणि त्यांचा समूह गेल्या महिन्याभरापासून मीडियात चर्चेत आहे. आता या समूहाने एक नवीन कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे काम काय आहे, तिचे औरंगाबाद कनेक्शन काय आहे, ते पाहुयात.

Adani Aurangabad :  गौतम अदानी यांचे औरंगाबाद कनेक्शन काय? कोणती केली नवीन कंपनी स्थापन, काय करेल काम
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 6:36 PM

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांचा अदानी समूह (Adani Group) मीडियात सातत्याने चर्चेत आहे. या समूहाच्या उदयापासून ते पडझडीच्या अनेक बातम्या तुम्ही या दीड महिन्यात वाचल्या असतील. तर त्यापूर्वी अदानी कसे झपाट्याने जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले, त्यांनी दुसऱ्या क्रमांकापर्यंत कशी झेप घेतली हे कौडकौतूकही तुम्ही वाचले असेल. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची पडझड आणि झपझप कोसळलेल्या त्यांच्या शेअर्सची माहिती ही तुम्ही वाचली असेल. त्यानंतर आता काही स्टॉकला अप्पर सर्किट लागल्याची बातमी येऊन धडकली आहे. या सर्व घडामोडीत गौतम अदानी यांनी एक नवीन कंपनी (New Company) स्थापन केली आहे. या कंपनीचे काम काय? ती कशासाठी स्थापन केली, तिचे औरंगाबाद कनेक्शन (Aurangabad Connection) काय? हे पाहुयात..

अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीने ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. म्हणजे अदानी ट्रान्समिशनची उपकंपनी अस्तित्वात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) असे या कंपनीचे नाव आहे. अदानी ट्रान्समिशनने या घडामोडींविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, अदानी ट्रान्समिशनने संपूर्ण स्वतंत्र असलेली आणि सहाय असलेली कंपनी स्थापन केली आहे. 15 मार्च 2023 रोजी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अर्थात कंपनीने अद्याप व्यावसायिक सुरुवात केलेली नाही.

काय आहे प्लॅन

हे सुद्धा वाचा

अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अदानी ट्रान्समिशनने ही कंपनी स्थापन केली आहे. औरंगाबादमध्ये समांतर वितरण परवाना लागू करण्यासाठी या कंपनीची मदत होणार आहे. अजून या कंपनीचे एकूण कार्य आणि तिचा उद्देश स्पष्ट करण्यात आला नाही. तसेच या कंपनीचे काम कसे चालेल, याची माहिती देण्यात आलेली नाही. या कंपनीचे कार्यालय कुठे आहे. तिचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शेअर्सची अवस्था काय

  1. अदानी समूहाच्या शेअर बाजारात 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत. त्यातील सहा कंपन्यानी आज लाभासह व्यापार बंद केला. तर चार कंपन्यांना स्टॉक मार्केटमध्ये नुकसान सहन करावे लागले. बीएसईवर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर पाच टक्क्यांनी वधरला. आज त्याची किंमत 777.95 रुपये आहे. या कंपनीचे बाजार मूल्यांकन 5860.92 कोटी रुपयांहून 1.23 लाख कोटी रुपये झाले. या शेअरने अप्पर सर्किट लावले होते.
  2. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 4.84 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज 976.05 टक्क्यांवर बंद झाला. या कंपनीचे बाजार मूल्यांकन 5,025.29 कोटी रुपयांहून 1.08 लाख कोटी रुपये झाले आहे. या कंपनीच्या अंतर्गतच अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे
  3. अंबुज सिमेंट्स 3.74 टक्क्यांनी वाढला. हा शेअर आता 378.60 रुपयांवर बंद झाला. तर एसीसी चा शेअर 0.73 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 1753.15 रुपयांवर आज बंद झाला. अदानी पोर्टस आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा शेअर आज स्थिर होता. तो 679.15 रुपयांवर बंद झाला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.