Gautam Adani Trainman : या बिहारी बाबूची कमाल, गौतम अदानी कामावर फिदा, रेल्वे तिकीट विक्री कंपनीच टेकओव्हर करणार

Gautam Adani Trainman : अडचण सोडविण्यासाठी लढवलेली शक्कल एका बिहारी बाबूसाठी लाखमोलाची ठरली. उद्योगपती गौतम अदानी पण त्याच्यावर फिदा झाले. त्यांनी त्याची कंपनीच खरेदी केली.

Gautam Adani Trainman : या बिहारी बाबूची कमाल, गौतम अदानी कामावर फिदा, रेल्वे तिकीट विक्री कंपनीच टेकओव्हर करणार
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे आता रेल्वे सेक्टरमध्ये दमदार पाऊल टाकणार असल्याची बातमी तुम्हाला पण माहिती असेल. त्यांनी ऑनलाईन रेल्वे तिकीट विक्री करणारी कंपनी ट्रेनमॅनची (Trainman) 100 टक्के हिस्सा खरेदीची घोषणा केली आहे. अर्थात ही बातमी आल्याने अदानी समूह IRCTC पण ताब्यात घेणार असल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. आयआरसीटीसीने या बातम्यांचे खंडन केले. पण या गदारोळात ट्रेनमॅनची सुरुवात, अडचण सोडविण्यासाठी लढवलेली शक्कल एका बिहारी बाबूसाठी कशी लाखमोलाची ठरली ही यशोगाथा मागे पडली. चला तर पाहुयात पडद्यामागची घडामोडी..

बिहारी बाबूने सुरु केली कंपनी गुरुग्राम येथील स्टार्क एंटरप्राईजेज प्रायव्हेट लिमिटेडची (SEPL) कंपनी ट्रेनमॅन IRCTC ची अधिकृत ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्टअप सुरु केले. ही कंपनी IIT रुरकीचे विद्यार्थी विनीत चिरानियाने (Vineet Chirania) त्याचा मित्र करण कुमार याच्या मदतीने सुरु केली. हे दोन्ही आयआयटीएन आहेत. त्यांनी नोकरी सोडून या व्यवसायात उडी घेतली. विनीत हे बिहारमधील भागलपूरचे रहिवाशी आहेत. 2016 मध्ये त्यांनी या कंपनीची नोंदणी केली होती. ही कंपनी सुरु करण्यापूर्वी दोघांनी अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे.

कशी सुचली आयडिया ट्रेनमॅनचे सीईओ विनीत कुमार चिरानिया यांनी एका मुलाखतीत कंपनीची कल्पना कशी सुचली हे सांगितले. ते जेव्हा गावी जायचे, तेव्हा त्यांना अनेकदा उभ्याने प्रवास करावा लागला. अनेकदा तिकीट कन्फर्म होत नसे. तर कधी वेटिंगवर गावी जावे लागे. तेव्हाच विनीतला ट्रेन तिकीट बुकिंगसाठी एक प्लॅटफॉर्म सुरु करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच या प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा

​​80 लाख डाऊनलोड विनीत यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो प्रवाशी भेट देतात. ट्रेनमॅन ॲप 80 लाखांहून अधिक प्रवाशांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेले आहे. कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन एक दशलक्ष तिकीटांची बुकिंग झाली आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर PNR स्टेटस वरुन तिकीट कन्फर्म आहे की नाही याचा अचूक अंदाज मिळतो. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर भेट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

​50 हजारात सुरु केली, आज 80 कोटींची कंपनी गुडगाव येथून ट्रेनमॅनची सुरुवात झाली. 50 हजार रुपयांमध्ये ही कंपनी सुरु झाली. कंपनीने पहिल्याच महिन्यात 30000 रुपयांची कमाई केली होती. सुरुवातीला कंपनीला फंडिंग मिळाले नाही. जुलै 2022 मध्ये या कंपनीला 9 कोटींचा निधी मिळाला. आता या कंपनीचे मूल्य आज 80 कोटींच्या घरात आहे. अदानी समूह आता या ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्मच्या मदतीने रेल्वे सेक्टरमध्ये दबदबा तयार करणार आहे. अदानी समूहाने 2022 मध्ये फ्लिपकार्टच्या ClearTrip चे अधिग्रहण करुन फ्लाईट आणि कॅब बुकिंग सेक्टरमध्ये पाय ठेवला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.