अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ
उद्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (FM Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प (Economy Budget 2022) सादर करणार आहेत. हा त्यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर होेण्यापूर्वीच त्याचा शेअरमार्केटवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पहायाला मिळत आहे.
नवी दिल्ली : उद्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (FM Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प (Economy Budget 2022) सादर करणार आहेत. हा त्यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम हा शेअरमार्केटवर देखील झाल्याचे पहायाला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच शेअर बाजाराने (Stock market) 2 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. गेल्या दोन आठवड्यांपासून देशांतर्गत शेअर बाजारावर विक्रीचा दबाव आहे. मात्र, हा आठवडा बाजारासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, उद्या अर्थमंत्री निर्मला सितारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेअर बाजाराला देखील अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षेनुसार बजेट राहिल्यास या आठवड्यात शेअरबाजारातील घोडदौड कायम राहील.
सेन्सेक्स वधारला
आज सकाळी शेअरबाजार सुरू होताच सेन्सेंक्समध्ये थोडीशी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीत तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 700 अकांनी वधारून 58 हजारांच्या जवळपास पोहोचला. तर निफ्टीमध्ये देखील 1.25 टक्क्यांची वाढ झाली. सध्या निफ्टीने 17,300 चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअरमार्केटमध्ये सातत्याने चढउतार पहायला मिळत आहे. या पार्श्वभमीवर आज या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांची सावध भुमिका
ब्रिटनच्या सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंडच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयाच्या शक्यतेचा आशियाई शेअर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊन गुंतवणूक करताना दिसत आहेत. आज भारतीय शेअर बाजाराप्रमानेच हाँगकाँगचा हँग सेंग 1.50 टक्क्यांपर्यंत वाढला तर जपानच्या शेअरबाजारामध्ये देखील उसळी पहायला मिळाली. दुसरीकडे मात्र शांघाय कंपोझिट एक टक्क्यांनी घसरला.