RBI गव्हर्नर म्हणतात, देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर, पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठी बातमी
शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कमी केलेले उत्पादन शुल्क आणि विविध राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅट कमी केल्याने देशातील सामान्य लोकांची क्रयशक्ती वाढेल. हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक चांगले सिद्ध होईल, कारण यामुळे अतिरिक्त वापरासाठी अधिक जागा निर्माण होईल.
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ने आज ‘SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्ह’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता. मी अर्थव्यवस्थेसाठी जोरदार पुनरागमन पाहत आहे, यामुळे कंपन्यांना अनुकूल आर्थिक परिस्थितीमध्ये क्षमता वाढवण्यासाठी आणि रोजगार, गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
साथीच्या रोगानंतर भारतामध्ये वेगाने वाढ
शक्तिकांत दास म्हणाले, “मला विश्वास आहे की, साथीच्या रोगानंतरच्या परिस्थितीत भारतामध्ये अधिक वेगाने वाढ करण्याची क्षमता आहे. अनेक उच्च वारंवारता निर्देशक सूचित करतात की, देशाची अर्थव्यवस्था वेग घेत आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना ती व्यापक आणि सुस्थापित होण्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करायची आहेत.”
कृषी आणि उत्पादन क्षेत्रातील एकूण रोजगार 56 टक्के
ते पुढे म्हणाले, “भारतातील कृषी आणि उत्पादन क्षेत्रातील एकूण रोजगार 56 टक्के आहे, परंतु सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्यांचे योगदान 25 टक्के आहे. आमच्या कर्मचार्यांचा एक मोठा वर्ग कमी उत्पादकतेच्या क्षेत्रात अडकलाय, ज्यामुळे आमच्या वाढीच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.”
पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठी बातमी
शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कमी केलेले उत्पादन शुल्क आणि विविध राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅट कमी केल्याने देशातील सामान्य लोकांची क्रयशक्ती वाढेल. हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक चांगले सिद्ध होईल, कारण यामुळे अतिरिक्त वापरासाठी अधिक जागा निर्माण होईल.
There are signs that consumption demand, triggered by the festive season, is making a strong comeback. This should encourage firms to expand capacity and boost employment & investment amidst congenial financial conditions: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/xacipnmCL1
— ANI (@ANI) November 16, 2021
सर्व योजनांची अंतिम तारीख असणे आवश्यक
शक्तिकांत दास म्हणाले, “आवधिक पुनरावलोकनानंतर विद्यमान योजना त्यांच्या वास्तविक परिणामांच्या आधारे टप्प्याटप्प्याने बंद केल्या पाहिजेत, ज्यामुळे मर्यादित संसाधनांचे अधिक कार्यक्षम वाटप होईल. लाँच केलेल्या प्रत्येक नवीन योजनेची शेवटची तारीख असावी, जी त्याच्या परिणामांशी जोडलेली असेल.
संबंधित बातम्या
iPhone 12 पेक्षा कमी किंमतीत iPhone 13 खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
मुलाच्या शिक्षणाचे टेन्शन विसरा; फक्त आजपासून सुरू करा हे काम