Chandrayaan-3 : चंद्रयान-3 सारखीच या सरकारी कंपनीची रॉकेट भरारी! अदानी समूहाने दिली कोट्यवधींची ऑर्डर
Chandrayaan-3 : मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवातीलाच या सरकारी कंपनीच्या शेअरने रॉकेट भरारी घेतली. आज बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी चंद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे या मिशनशी संबंधित सर्व शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअरने (Adani Group Share) गेल्या तीन दिवसांत मोठी झेप घेतली आहे. या समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांची नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली. त्यांनी टॉप-20 मध्ये पुन्हा एंट्री घेतली. अदानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. आज बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी चंद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरणार आहे. या मिशनशी संबंधित सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये उलाढाल दिसून येत आहे. भारत हेवी इेलक्ट्रिकल्स लिमिटेड, अर्थात भेलचा (Bharat Heavy Electricals Ltd-BHEL) शेअर रॉकेट भरारी घेत आहे. या शेअरमध्ये आता अदानी समूहाने पण मोठा डाव लावला आहे. या सरकारी कंपनीत अदानी समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीला अदानी समूहाने मोठी ऑर्डर दिली आहे.
इतक्या कोटींची दिली ऑर्डर
अदानी समूहाची उपकंपनी Mahan Energen Ltd ने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 4000 कोटी रुपयांची ऑर्डर दिली. या ऑर्डरचा तात्काळ प्रभाव मंगळवारी भेलच्या शेअरवर दिसला आहे. शेअर बाजारात ही कंपनी तेजीत होती. कंपनीच्या स्टॉकमध्ये 9.76 टक्क्यांची उसळी दिसून आली. हा शेअर 110.80 रुपयांवर बंद झाला.
शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
मंगळवारी शेअर बाजारात भेलला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाल्याचे वृत्त येऊन धडकले. सकाळी 9:15 वाजता हा स्टॉक 110:50 रुपयांवर उघडला. त्यानंतर हा शेअर 112.85 रुपयांवर पोहचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. त्यानंतर हा शेअर घसरुन 110.80 रुपयांवर बंद झाला.
काय दिली ऑर्डर
अदानी समूहातील उपकंपनी, महान इर्नजेन लिमिटेडने भारत हेवी इलेक्ट्रिकल्सला ही मोठी ऑर्डर दिली आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील पॉवर प्रोजेक्टसाठी आवश्यक उपकरणे आणि इतर साधनांचा पुरवठा करावा लागेल. BHEL बॉयलर, टरबाईन आणि जनरेटसह कंट्रोल आणि इतर उपकरणांचा पुरवठा करणार आहे.
पाच वर्षांत इतका परतावा
BHELने गेल्या पाच वर्षांत मोठा परतावा दिला. गेल्या पाच वर्षांत या समूहाने 38 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीने चंद्रयान मिशनसाठी बॅटरी आणि इतर कंपोनेंट उपलब्ध करुन दिले. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये 10.11 टक्के तेजी दिसून आली. एका वर्षांत या स्टॉने 108.8 टक्क्यांचा तात्काळ परतावा दिला. या शेअरमध्ये वर्षाभरात 57.75 रुपयांची तेजी आली आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.