Share Market | शेअर बाजाराची दहा वर्षांत गरुड झेप! 71000 अंकांचा ओलांडला टप्पा

Share Market | शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड नावे केला. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार नवनवीन विक्रम नावावर नोंदवत आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाचा विचार करता, या 9 वर्षांत शेअर बाजाराने 48,590 अंकांची मुसंडी मारली आहे. जागतिक बाजारात भारतीय अर्थव्यवस्था दमदार कामगिरी बजावत असताना शेअर बाजार पण आघाडीवर आहे.

Share Market | शेअर बाजाराची दहा वर्षांत गरुड झेप! 71000 अंकांचा ओलांडला टप्पा
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 3:40 PM

नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : शेअर बाजारात तेजीचे सत्र आहे. दिवाळीपासून शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे. तर मोदी सरकारच्या काळात गेल्या 9 वर्षांत बाजाराने उत्तुंग झेप घेतली आहे. शेअर बाजार अजून नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताच्या सकल उत्पादनाच्या आकड्यांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला. तसा आता भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीने जगातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. भारतीय शेअर बाजार नवीन उच्चांकावर आहे. आज, शुक्रवारी शेअर बाजार पहिल्यांदा 71,000 हजार अंकांच्या पुढे गेला. मोदी सरकारच्या या कार्यकाळात सेन्सेक्स 116 टक्क्यांहून अधिक उसळला. 2014 ते 2023 या कार्यकाळात निर्देशांकाने 48,590 अंकांची गरुड झेप घेतली.

2014 मध्ये अशी सुरुवात

मे 2014 मध्ये सेन्सेक्स 22,493 अंकावर उघडा. याच महिन्यात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. याच मे महिन्यात सेन्सेक्स 27,499 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर काही काळ निर्देशांक 19,963 अंकावर पण घसरला. बीएसईवर दिलेल्या काही आकड्यानुसार, निर्देशांकांनी 2014 च्या सुरुवातीला 21,222 अंकावर होता. याच वर्षी निर्देशांक 28,822 अंकांच्या उच्चांकावर पोहचला. या एका वर्षांत सेन्सेक्सने एकूण 6,277 अंकांची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

मधल्या टप्प्यात मोठा संघर्ष

वर्ष 2015 मध्ये शेअर बाजाराला धक्का लागला. शेअर बाजार 30,024 अंकावर पोहचला आणि त्यानंतर पुन्हा झटक्यात खाली आला. शेअर बाजार पुन्हा 22,494 च्या खालच्या स्तरावर आला. 2017 मध्ये बाजारात 7,345 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स यावर्षी 34,056 अंकावर पोहचला. 2018 हे वर्ष पण बरं निघालं. त्यानंतर बाजार 36,068 अंकावर बंद झाला. या काळात बाजार 2008 अंकांनी वधारला.

2019-2021 या काळात बंपर उसळी

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा मोठी उसळी घेतली. सेन्सेक्स 2019 मध्ये 5091 अंक, 2020 वर्षात 6401 अंक आणि 2021 मध्ये शेअर बाजार 10,468 अंकांची उसळी आली. दोन वर्षे कोरोनाने कहर केला. 2020 मध्ये निर्देशांकाने 47,896 अंकावर पोहचला. 2021 मध्ये सर्व रेकॉर्ड तोडत निर्देशांक 62,245 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.

2022-2023 मध्ये निर्देशांकची घौडदौड

बीएसईने दिलेल्या आकड्यानुसार, सेन्सेक्स 2022 मध्ये 58,310 अंकावर उघडला आणि तो वर्षाच्या अखेरीस 60,840 अंकाच्या स्तरावर पोहचला. 2023 च्या सुरुवातीला निर्देशांक 60,871 अंकावर पोहचला. आता 15 डिसेंबर रोजी बीएसई निर्देशाकांने ऑल टाईम हाय 71,084 अंकावर पोहचला. निर्देशांकाने 10,212 अंकांची तेजी नोंदवली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.