नवीन वर्षांत बदल शेअर बाजारात, शनिवारी पण करा ट्रेडिंग
Share Market | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षात शेअर बाजार शनिवारी पण सुरु राहील. शनिवारी पण गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येईल. शनिवारी आणि रविवारी बाजाराला सुट्टी असते. पण 2024 मध्ये 20 जानेवारी रोजी शेअर बाजार ट्रेडिंगसाठी सुरु असेल.
नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. काही तासातच नवीन वर्ष सुरु होत आहे. शेअर बाजाराविषयी नवीन अपडेट समोर येत आहे. नवीन वर्षात शनिवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग होणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवारी आणि रविवारी शेअर बाजाराला सुट्टी असते. पण वर्ष 2024 मध्ये 20 जानेवारी रोजी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येईल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी देशातील अनेक शहरातील बँका बंद असतील. पण शेअर बाजाराला सुट्टी नाही. बीएसई आणि एनएसईमध्ये ट्रेडिंग करता येईल. बाजाराला सुट्टी नाही.
शनिवारी लाईव्ह सेशन
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने रिकव्हरी साईटवर स्विच करण्यासाठी 2 स्पेशल लाईव्ह सेशन आयोजीत केले आहे. 20 जानेवरी 2024 रोजी लाईव्ह सेशन होईल. पहिले सत्र 9:15 वाजता सुरु होईल आणि 10 वाजता बंद होईल. तर दुसरे सत्र सकाळी 11:30 वाजता सुरु होईल आणि दुपारी 12:30 वाजता बंद होईल.
या कारणामुळे विशेष सत्र
नवीन वर्षात या ट्रेडिंग सेशनच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंज डिझास्टर रिकव्हरीच्या (DR) साईटची ट्रायल करण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही अडथळ्याविना गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता यावे यासाठी ही उपाय योजना करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे सायबर अटॅक, सर्व्हर क्रॅश वा इतर संकटात साईट सहज चालावी यासाठी हा उपाय करण्यात येत आहे.
परिपत्रक केले जारी
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याविषयीचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये व्यापारी सत्राविषयी माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार, सकाळी 9 ते 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत प्री-ओपन सेशन असेल. त्यानंतर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी व्यापारी सत्र सुरु होईल. दुसरे विशेष लाईव्ह ट्रेडिंग सेशन डीआर या नवीन साईटवर होईल. या साईटवर प्री ओपन सेशन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल. हे सत्र 11 वाजून 30 मिनिटांवर बंद होईल. सर्वसामान्य बाजार सकाळी 11 वाजून 30 मिनिटाला सुरु होईल आणि दुपारी 12 वाजून 30 मिनिटांवर बंद होईल.