महासत्ता अमेरिकाच कर्जाच्या खाईत; भारताला अब्जावधींचे नुकसान होणार
विशेष म्हणजे याआधीसुद्धा येलेन यांनी अमेरिकेला कर्जावरून इशारे दिलेत. Squawk Box ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. जर अमेरिकन काँग्रेसने कर्जाकडे योग्य लक्ष दिले नाही, तर अमेरिकेवर मंदीचे सावट येऊ शकते.
नवी दिल्लीः महासत्ता असलेल्या अमेरिकेची (United states of America) हालत येत्या काळात खूपच गंभीर होण्याची शक्यता आहे. अमेरिका मोठ्या मंदीच्या छायेखाली आहे. त्यामुळे आता जगाची चिंता वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवर दोन दशकांत कर्जाचे ओझे प्रचंड वाढलेय. अमेरिकेवर एकूण 29 हजार अब्ज डॉलरचे कर्ज आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा भार वाढतोय. अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज हे जपान आणि चीनचे आहे. ते सर्वात मोठे कर्जदाते आहेत.
येलेन यांचे अमेरिकेला कर्जावरून इशारे
विशेष म्हणजे याआधीसुद्धा येलेन यांनी अमेरिकेला कर्जावरून इशारे दिलेत. Squawk Box ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. जर अमेरिकन काँग्रेसने कर्जाकडे योग्य लक्ष दिले नाही, तर अमेरिकेवर मंदीचे सावट येऊ शकते.
अमेरिकेवर प्रचंड कर्जाचे ओझे
अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट लुईस येलेन (Janet Louise Yellen) यांनी अमेरिकेवर प्रचंड कर्जाचे ओझे असल्याचे सांगितलेय. तसेच जर अमेरिका हे कर्ज फेडण्यास अपयशी ठरली किंवा डिफॉल्टर ठरली तर कोरोनानंतरच्या मंदीनंतर आणखी एक मोठी मंदीची लाट येऊ शकते, असा इशारा देण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे भारताचेही अमेरिकेवर 216 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. चीनचे अमेरिकेवर 1000 अब्ज डॉलरचे कर्ज आहे, तर जपानचेदेखील 1000 अब्ज डॉलर एवढे कर्ज अमेरिका देणे आहे. याचबरोबर ब्राझीलने देखील अमेरिकेला 258 अब्ज डॉलर दिलेय.
ओबामांच्या काळात अमेरिका कर्जाच्या विळख्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जानेवारीमध्ये 1900 अब्ज डॉलरच्या कोरोना दिलासा पॅकेजची घोषणा केली होती. महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटावर उपाय करण्यात आलेत. 2000 च्या सुरुवातीला अमेरिकेवर 5600 अब्ज डॉलरचे कर्ज होते. ओबामा यांच्या आठ वर्षांत आपण कर्जाचे ओझे दुप्पट केले आहे.
संबंधित बातम्या
भारताचे नवे सोने विनिमय कसे कार्य करेल? तुम्ही अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता
The superpower America is in debt; India will lose billions