Milk Price Hike | मिठाईचा गोडवा महागणार! सणासुदीत दुधाच्या किंमतीचा तुमच्या खिश्यावर थेट परिणाम

Milk Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात दुधाच्या किंमती वाढल्याने मिठाईचा गोडवा ही महाग होण्याची शक्यता आहे. मिठाई 10 ते 15 रुपायांनी वाढण्याची शक्यता आहे.

Milk Price Hike | मिठाईचा गोडवा महागणार! सणासुदीत दुधाच्या किंमतीचा तुमच्या खिश्यावर थेट परिणाम
मिठाई खरेदी नावाखाली इसमाची अडीच लाखाची फसवणूकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:01 AM

Milk Price Hike | आता सणांमधील(Festival Season) मिठाईचा (Sweets)गोडवा ही महाग होणार आहे. दुधाच्या किंमती वाढवल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. अमूल (Amul), महानंद (Mahanand)आणि मदर डेअरीसह (Mother Dairy) इतर ही डेअरींनी दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे. दुधाच्या दरात (Milk Price Hike) लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून मिठाई तयार करण्यात येते. सणांच्या तोंडावरच दूध महाग झाल्याने त्याचा परिणाम मिठाईसह इतर उत्पादनांवरही दिसून येईल. मिठाई तयार करण्यासाठी जवळपास 60 टक्क्यांपर्यंत दुधाचा वापर करण्यात येतो. दुधाच्या किंमती वाढल्याने तुमच्या आवडीच्या मिठाईचे दर ही प्रति किलो 10 ते 15 रुपायांनी वाढण्याची शक्यता आहे. दुधाच्या किंमती वाढल्याने मिठाई दुकानदार चिंताग्रस्त झाले आहे. तर मिठाईचे भाव वाढणार असल्याने ग्राहकांना मिठाईचा गोडवा महाग पडणार आहे.

15 रुपयांनी वाढले दुधाचे भाव

गेल्या चार वर्षांत दुधाच्या किंमतीत (Milk Price Hike) सातत्याने वाढ करण्यात येत आहे. ही वाढ एक ते दोन रुपयांनी होत असल्याने त्याची झळ लागलीच जाणवत नाही. मात्र गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दुधाचे भाव कितीने वाढले हे लक्षात येईल. चार वर्षांपूर्वी दूध 40 ते 45 रुपये लिटर दराने मिळत होते. आता दुधाचे दर 65 रुपये झाले आहेत. म्हणजे गेल्या चार वर्षांत दुधाचे भाव 15 रुपयांनी वाढले आहेत. एक लिटर दूध प्रत्येक दिवशी लागणाऱ्या कुटुंबाला(Family) या दरवाढीचा फटका काय असतो हे सहजच लक्ष्यात येईल.

हे सुद्धा वाचा

खिसा होईल खाली

दूध दरवाढीचा थेट परिणाम दुग्धजन्य पदार्थांवर होणार आहे. मिठाईसाठी सर्वाधिक वापर खव्याचा होतो. खाव्यासाठी दूध आटवण्यात येते. पाच लिटर दूध उकळवल्यानंतर एक किलो खवा तयार करण्यात येतो. प्रति लिटर दूध दरात वाढ गृहित धरली तर पाच लिटर दुधासाठी मिठाई उत्पादकांना आता 10 ते 15 रुपये जादा मोजावे लागतील. परिणामी तुमची आवडती मिठाईही महाग होईल. दुधापासून खवा, रबडी, रस गुल्ला, बर्फी या मिठाईसोबतच पनीर, दही, ताक, लस्सी हे पदार्थ ही तयार करण्यात येतात. त्यातच ब्रँडेड आणि सीलबंद दही, लस्सीवर सरकारने अगोदरच 5 टक्के जीएसटी लावला आहे. या सर्वांमुळे सर्वसामान्यांचा खिशा खाली होईल हे मात्र नक्की.

मक्तेदारीचा फटका

ग्रामीण आणि निमशहरी भागातही आता पॅकबंद दुधाने शिरकाव केलेला आहे. अनेक दूध उत्पादक कंपन्यांची आता या क्षेत्रात मक्तेदारी केली आहे. त्यामुळे या कंपन्या जे भाव ठरवतील, त्याचे अनुकरण स्थानिक दूध उत्पादक कंपन्यांनी करतात आणि दुधाचे भाव देशभरात सर्वत्र एकाचवेळी वाढतात. एवढेच नव्हे तर सुट दूध विक्री करणारे दूध विक्रेतेही याचा फायदा घेत दुधाचे दर वाढवतात. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक कंपन्यांची ही मक्तेदारी वेळीच मोडीत काढली नाहीतर सर्वसामान्य नागरिकांना घोटाच्या दुधालाही खिसा खाली करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.