Share Market ने रचला पुन्हा इतिहास; Budget 2024 पूर्वीच शेअर बाजार हिंदोळ्यावर

Sensex New High : शेअर बाजारात मंगळवारी प्री-ओपन मार्केटमध्ये तेजीचे तुफान आले. बीएसईच्या 30 शेअर असणाऱ्या सेन्सेन्कने मोठी भरारी घेतली. 300 अंकांच्या जोरदार उसळीसह सेन्सेक्सने इतिहास रचला, सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला.

Share Market ने रचला पुन्हा इतिहास; Budget 2024 पूर्वीच शेअर बाजार हिंदोळ्यावर
शेअर मार्केट सूसाट
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 10:48 AM

भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी मैलाचा दगड रोवला. प्री-ओपन मार्केटमध्ये तुफान तेजीचे सत्र दिसून आले. प्री-ओपनिंग सत्रात मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरच्या सेन्सेक्सने इतिहास रचला. 300 अंकांच्या जोरदार उसळीसह सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला. या महिन्याच्या अखेरच्या सत्रात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजाराने धुवांधार बॅटिंग केली. त्यामुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ आले आहे.

सेन्सेक्स 364.18 अंकाची कमाई

शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई केली. त्यामुळे सेन्सेक्स 79,840.37 अंकावर उघडला. एनएसई निफ्टी 86.80 अंक वा 0.36 टक्क्यांसह उसळला. निफ्टी 24,228.75 स्तरावर पोहचला.

हे सुद्धा वाचा

BSE चे भांडवल आता किती?

BSE चे मार्केट कॅप आज 443.14 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. अमेरिकन डॉलरमध्ये गिणती केली असता बीएसईवरील सूचीबद्ध स्टॉक्सचे एकूण मार्केट कॅप 5.31 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे. बीएसईवर 3346 शेअरमध्ये ट्रेड होत आहे. तर 2033 शेअरने उसळी घेतली आहे. 1235 शेअरमध्ये घसरण झाली तर 99 शेअर कुठल्याही बदलाशिवाय व्यापार करत आहे. 161 शेअरमध्ये अप्पर सर्किट लागलेले आहे. तर 53 शेअरमध्ये लोअर सर्किट लागलेले आहे.

सेन्सेक्समधील शेअरची कमाल

सेन्सेक्सच्या 30 मधील 13 शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली. तर 17 शेअरमध्ये घसरण दिसली. पॉवरग्रिडने सर्वात दमदार कामगिरी बजावली. हा शेअर 0.91 टक्क्यांनी वधारला. इन्फोसिस 0.88 टक्के, टीसीएस 0.63 टक्के, एचसीएल टेक 0.61 टक्के, भारती एअरटेल 0.44 टक्के आणि एलअँडटी 0.38 टक्के तेजीत आहे. तर कोटक महिंद्रा बँक 1.94 टक्के, बजाज फायनान्स 1.83 टक्के, टाटा मोटर्स 1.59 टक्के, ॲक्सिस बँक 1.39 टक्के तर आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1.28 टक्के घसरला.

निफ्टीची घौडदौड काय?

निफ्टीच्या 50 मधील 19 शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. तर 31 शेअरमध्ये घसरण दिसली. ओएनजीसी 2.14 टक्क्यांच्या तेजीसह टॉप गेनर ठरला. कोल इंडिया 1.89 टक्के, विप्रो 1.23 टक्के, पावरग्रिड 1.12 टक्के आणि इंन्फोसिस 1.08 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार करत आहेत. तर कोटक महिंद्रा बँक 2.14 टक्के, श्रीराम फायनान्स 1.89 टक्के, एचडीएफसी लाईफ 1.85 टक्के, एसबीआय लाईफ 1.84 टक्के तर बजाज फायनान्स 1.77 टक्के घसरणीसह व्यापार करत आहे. बँक निफ्टीने आज 52,828 ची उंचाकी भरारी घेतली. बँक निफ्टीतील 12 पैकी 3 शेअरमध्ये तेजी तर 9 शेअरमध्ये घसरण दिसली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.