प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका

शेअर बाजारातील अस्थिरतेचा सर्वसामान्य गुंतवणुकदारांनाच नव्हे तर गर्भश्रीमंतांनाही मोठा दणका बसला. नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी रुपये बुडाले.

प्रचंड नुकसान! नववर्षात गर्भश्रीमंतांचे तब्बल 47.62 लाख कोटी बुडाले, शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका
श्रीमंतांचं कोट्यवधींचं नुकसान
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:25 AM

शेअर बाजाराने सर्वसामान्यांचेच नव्हे तर जगभरातील श्रीमंतांचे (World Wealthiest) ही पिसे काढली. अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी श्रीमंत ओळखले जातात. सर्वसामान्य गुंतवणुकदार ही श्रीमंतांना फालो (Follow) करतात. श्रीमंतांनी कोणता शेअर खरेदी केला? किती शेअर खरेदी केले? कोणत्या कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली? कोणत्या योजनेत त्यांनी रस दाखविला? या बातम्यांवर सर्वसाधारण गुंतवणुकदारांचे (Investor) बारीक लक्ष असते. त्यांनी केलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करणारे ही कमी नाहीत. सरळ-सरळ कॉपी पेस्ट करुन झटपट श्रीमंतीचा शॉर्टकट अनेकजण निवडतात. पण हा शॉर्टकट्सच अनेक गुंतवणुकदारांना डोकेदुखी ठरला. कारण ही तसेच आहे. नवीन वर्षात जगभरातील 500 श्रीमंतांना दिवसाच तारे दिसले. शेअर बाजारातील (Share Market) प्रचंड उलथापालथीचा परिणाम त्यांच्या गुंतवणुकीवर झाला. गेल्या 28 दिवसांत त्यांची 47.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता बुडाली. सध्या ही संपत्ती 582 लाख कोटी डॉलर्सवर पोहचली आहे. 3 जानेवारी रोजी या गर्भश्रीमंतांची संपत्ती 630 लाख कोटी रुपये होती.

जगभरातील बाजारपेठांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घसरणीचे सत्र सुरु होते. 3 जानेवारीपासून तर या बाजारपेठांमध्ये उलथापालथीने कहर केला. त्यातच कोरोनाची तिसरी लाट, इंधनाचे वाढते दर आणि युक्रेन आणि रशियामधील युद्धाचे गडद होणारे ढग यामुळे परकीय गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतला आहे. यासर्व परिस्थितीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात चार ते पाच वेळा वाढ करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे बाजार घसरणीच्या मार्गावर पोहचला आहे. बाजारातील या गुडगुडीचा सर्वात मोठा फटका जगभरातील 500 श्रीमंतांना बसला आहे. त्यांच्या गुंतवणुकीचे शेअरने आपटी खाल्याने श्रीमंतांची संपत्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

वॉरेन बाबाचे व्वा रे-नारे

या सर्व परिस्थितीत ही जगातील सर्वात श्रीमंत वॉरेन बफे यांच्या संपत्तीला धक्का बसला नाही. त्यांना शेअर मार्केटच्या या उलथापालथीचा कसला ही धोका पोहचला नाही. जगाताली सर्वात मोठे गुंतवणुकदार असलेल्या बफे हे मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत झाले आहेत. 28 जानेवारी रोजी 91 वर्षीय वॉरेन बफे यांनी अव्वल स्थान पटकावले. त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. जगातील प्रमुख 10 व्यक्तींमध्ये केवळ बफे यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बफे यांच्या संपत्तीत 2.4 अब्ज डॉलर वाढ झाली आहे तर गौतम अदानी यांच्या मालमत्तेत 8.68 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

यांचे कोट्यवधी रुपये बुडाले

जेफ बेजोस 27 अब्ज डॉलर एलॉन मस्क 25.8 अब्ज डॉलर बर्नार्ड अरनॉल्ट 18.4 अब्ज डॉलर मार्क झुकरबर्ग 15.2 अब्ज डॉलर सर्जी ब्रीन 12.4 अब्ज डॉलर स्टिव्ह बामर 12.2 अब्ज डॉलर बिल गेट्स 11 अब्ज डॉलर मुकेश अंबानी 2.07 अब्ज डॉलर

संबंधित बातम्या :

Salary hike | पगारवाढीला अच्छे दिन! महामारीचा परिणाम ओसरला? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Budget 2022: पायाभूत सुविधांवर भर, मात्र कर सवलतीत निराशा पदरी पडण्याची शक्यता

सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.