Milk Price Hike : दुधाने आणला तोंडाला फेस! दरमजल करत किंमती भिडल्या गगनाला

Milk Price Hike : गेल्या काही दिवसांपासून दूध दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे. सातत्याने किंमती वाढत आहे. जानेवारी 2022 मध्ये दूध महागाई दर 4.09 टक्के होता. आता तो 9.65 टक्के इतका आहे.

Milk Price Hike : दुधाने आणला तोंडाला फेस! दरमजल करत किंमती भिडल्या गगनाला
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:09 PM

नवी दिल्ली : या आठवड्यात किरकोळ महागाई दर (Inflation Rate) आणि घाऊक महागाईचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. अन्नधान्य, खाद्यतेलाच्या किंमती, भाजीपाला यांनी जनतेला दिलासा दिला आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत तर झपाट्याने घसरण दिसली आहे. पण दुधाने (Milk Price Hike) सर्वांचीच निराशा केली आहे. गाईचे असो वा म्हशीचे, सीलबंद, पॅकटबंद, बाटलीबंद अथवा खुले दूध घेतले तरी महागाईची झळ बसतेच. 20-25 रुपयांच्या आतबाहेर असणारे दूध आता 70 रुपयांच्या घरात पोहचले आहे. दर महिन्याला दुधाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात दुधाच्या किंमतीत 20 टक्के वाढ आली आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचे आकडे आले आहेत. दूध आणि यासंबंधीची उत्पादने महागली आहेत. त्यांचा महागाई दर 9.65 टक्के आहे, 10 टक्क्यांचा आसपास हा दर पोहचला आहे. जानेवारी 2023 मध्ये हा दर 8.79 टक्के होता. तर जानेवारी 2022 मध्ये म्हणजे 14 महिन्यांपूर्वी हा दर अधिक नव्हता. त्यावेळी दूध आणि त्याच्या उत्पादनांचा महागाई दर 4.09 टक्के होता. त्यानंतर त्यात रॉकेटच्या गतीने वाढ झाली आहे.

दूध आणि दुधाच्या पदार्थात 136 टक्क्यांची उसळी आली आहे. घाऊक किंमतींवर आधारीत महागाई दराचे आकडे दिलासादायक नाहीत. जानेवारी 2023 मध्ये दूध आणि दूधाचे पदार्थ प्रचंड महागले आहेत. हा दर आता 10.33 टक्के आहे. जानेवारीत हा दर 8.96 टक्के होता. दूध माघार घ्यायलाच तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे तोंड पोळले आहे. अनेकांनी दूध आणणे कमी केले आहे. अथवा दुधाचा उकडाच बंद केला आहे. बरेच लोक विविध फ्लेवर्सच्या बिना दुधाच्या चहाकडे वळाली आहेत.

हे सुद्धा वाचा

दुधाच्या महागाईवर एक नजर टाकली तर भावात किती वाढ झाली, हे दिसून येईल. अमूल ताजाचे दोन लिटर पॅक 30 जून 2021 रोजी 88 रुपयांना मिळत होते. आता हा भाव 108 रुपयांवर पोहचला आहे. अमुलच्या म्हशीचे दूध 30 जून 2021 रोजी 59 रुपये प्रति लिटरवर मिळत होते. आता त्यात 19 टक्के वाढ झाली आहे. हा दर आता 70 रुपये प्रति लिटरवर पोहचला आहे. अमूलचे गायीचे दूध दीड वर्षांपूर्वी 47 रुपये प्रति लिटर होते. आता हा भाव 56 रुपये प्रति लिटरवर पोहचला आहे. दुधाच्या भावात जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. एक वर्षात मदर डेअरी आणि अमूलने जवळपास पाच वेळा दरवाढ केली आहे. त्याचा ग्राहकांना जोरदार फटका बसला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.