Repo RBI FD Rate | रेपो रेटमध्ये झाली वाढ, आता या गुंतवणूकदारांची लागली लॉटरी

Repo RBI FD Rate | रिझर्व्ह बँकेने मे, जून आणि ऑगस्टमध्ये 3 वेळा रेपो दरांमध्ये 1.4 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता पुन्हा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे गुंतवणूकदार मालामाल होतील .

Repo RBI FD Rate | रेपो रेटमध्ये झाली वाढ, आता या गुंतवणूकदारांची लागली लॉटरी
तर व्याजदर वाढीचा फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:53 PM

Repo RBI FD Rate | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक नीती समितीने (RBI)रेपो रेट दरात वाढ केली आहे. परिणामी आता कर्जे महाग होतील तर ईएमआयमध्ये (EMI) ही वाढ होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या (Inflation) झळा सहन कराव्या लागतील. पण जर तुम्ही अजून ही मुदत ठेव अथवा आवर्ती मुदत ठेवमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण बँका जेव्हा कर्जावरील व्याजदर वाढवता. तेव्हा बचत आणि गुंतवणुकीवरील व्याजदर ही वाढतो. त्यामुळे तुम्हाला बचतीची सवय असेल तर तुमचा फायदा झालाच म्हणून समजा. कर्जावरील व्याजदर (Interest Rate) वाढेल तसेच मुदत ठेव (Fixed Deposit), आवर्ती ठेव योजनेवरील (Recurring Deposit) व्याजदरातही वाढ होईल आणि गुंतवणूकदारांना त्याचा थेट फायदा होईल. जेवढी गुंतवलेली रक्कम जास्त असेल तेवढे त्यावर जास्त व्याज मिळणार आहे.

तर वाढेल कमाई

आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. पण आरबीआयने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावली होती, ज्यात रेपो रेट 0.40% ने वाढवून 4.40% करण्यात आला होता. रेपो रेटमध्ये हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. या आर्थिक वर्षातील पहिली बैठक 6- 8 एप्रिल रोजी झाली. यानंतर 6 जून 8 रोजी झालेल्या मॉनेटरी पॉलिसीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50% वाढ करण्यात आली आहे. यामुळे रेपो रेट 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढला. आता ऑगस्टमध्ये त्यात अजून 0.50% वाढ करण्यात आल्याने हा दर 5.40% पर्यंत गेला आहे रिझर्व्ह बँकेच्या संकेतांनंतर बाजाराच्या अंदाजानुसार 2019 मधील हा रेपो दर 6 टक्क्यांच्या पातळीपर्यंत वाढू शकतो, म्हणजेच FD आणि बचत खात्यांमधील तुमची कमाई आगामी काळात वाढू शकते.

हे सुद्धा वाचा

किती फायदा होईल

समजा बँकांनी एफडीचे दर अर्धा टक्का वाढवले, तर 1 लाखाच्या एफडीवर 5 वर्षांच्या कालावधीत 3 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा येत्या काळात मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल. मुदत ठेवीत ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. ते नेहमी सुरक्षित पर्याय शोधतात. त्यात FD आणि RD हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. एकीकडे जर महागाई कमी झाली आणि गुंतवणुकीवर अतिरिक्त व्याज मिळाले तर फायदा तुमचाच होणार हे निश्चित आहे.

एफडीचे दर का वाढतात ?

रेपो दर वाढल्याने बँकां कर्जावरील व्याजदरात वृद्धी करतात. अशावेळी बँका ग्राहकांना त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा बँकेत ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यासाठी मुदत ठेव, बचत आणि आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात येते. त्यामुळे पारंपारिक आणि जोखीम न घेऊ इच्छिणारे गुंतवणूकदार या बचत योजनांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.