AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crude Oil : आता किती दिवस पाठ थोपटून घेणार, पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार

Crude Oil : केंद्र सरकारच्या धोरणांचे जनतेला कौतुकच आहे. पण आता एक वर्ष झाले, या कौतुकाचा लाभ काही जनतेच्या पदरात पडलेला नाही. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल आता कधी स्वस्ता होणार असा सवाल विचारण्यात येत आहे.

Crude Oil : आता किती दिवस पाठ थोपटून घेणार, पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार
कधी येणार स्वस्ताई
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 9:25 AM

नवी दिल्ली : भारताने व्यापारी घाटा सहन करत, रशियाकडून गेल्या वर्षभरापासून रेकॉर्डब्रेक स्वस्त कच्चा तेलाची खरेदी सुरु केली आहे. भारतीय कुटनीतीचे जगभरात कौतुक होत आहे. अमेरिकेला टशन देत भारताने रशियाकडून कच्चा तेलाच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. पश्चिमी देश, अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध घातला तर आहेच, पण रशियन उत्पादनांचा बहिष्कार ही केला आहे. पण पश्चिमी देश गॅससाठी रशियावरच अद्याप अवलंबून आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे युरोपियन युनियनने (EU) रशियावर प्रतिबंध लादला आहे. या संधीचा रशिया आणि भारताने फायदा उचलला. तर चीनने पण संधी साधून घेतली. केंद्र सरकारच्या धोरणांचे जनतेला कौतुकच आहे. पण आता एक वर्ष झाले, या कौतुकाचा लाभ काही जनतेच्या पदरात पडलेला नाही. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) आता कधी स्वस्ता होणार असा सवाल विचारण्यात येत आहे.

काय झाला फायदा भारतीय तेल रिफायनरीजला या धोरणाचा मोठा फायदा झाला. भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करुन युरोपीयन बाजारपेठेत विक्री करत आहे. कंपन्यांना फायद्यात आहे. पण तरीही देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलीच सवलत न मिळाल्याने जनता चिंतीत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात उत्पादन शुल्कात कापतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तेव्हापासून मोठा बदल झालेला नाही. पण फायदा ही मिळालेला नाही.

प्रति लिटर इतका नफा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices) गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल-डिझेल का होत नाही स्वस्त भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीच बदल झाला नाही. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. एक लिटर पेट्रोलमागे कंपन्यांना विक्रमी 17.4 रुपये आणि डिझेलमागे 27.7 रुपयांचा तोटा झाला. तेव्हा जनतेचा रोष नको म्हणून पेट्रोल-डिझेलचा भाव वाढविण्यात आला नाही. त्यावेळच्या तोट्याची भरपाई कंपन्या करुन घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कंपन्या फायद्यात असल्याचा दावा दरम्यान कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबर 2022 या दरम्यान 21,201 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांनी डिसेंबर 2022 पर्यंत नुकसान भरपाई केली. डिसेबंर 2022 मध्ये भारतीय तेल कंपन्यांनी सर्वाधिक कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले होते. त्याअगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पण रशियाकडूनच कच्चा तेलाची खरेदी केली होती. डिसेंबर महिन्यात भारत प्रत्येक दिवशी सरासरी 11 लाख 90 हजार बॅरल कच्चा तेलाची खरेदी करत होता. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये भारताने प्रतिदिवशी 36,255 बॅरल तेल खरेदी केले होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.