Share Market : शेअर बाजारात ट्रेडिंगला आज ब्रेक, या वर्षात इतक्या दिवस बंद राहील मार्केट

Share Market : गुरुवारी बीएसई आणि एनएसईला सुट्टी आहे. वर्षभरात इतक्या दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. इतक्या दिवस शेअर बाजाराचे कामकाज होणार नाही.

Share Market : शेअर बाजारात ट्रेडिंगला आज ब्रेक, या वर्षात इतक्या दिवस बंद राहील मार्केट
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 1:46 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) आज 29 जून 2023 रोजी सुट्टीमुळे बंद आहे. ईद-उल-अजहा, बकरी ईदमुळे मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) कोणतेच कामकाज होणार नाही. या दरम्यान वायदे बाजारात (Commodity Market) कोणताही सौदा होणार नाही. आता शुक्रवारी, 30 जून रोजी बाजार उघडेल. त्यानंतर पुन्हा दोन दिवस बाजार बंद असेल. बीएसई स्टॉक मार्केट केवळ याच दिवशी बंद असतो असे नाही. आठवड्यातील पाच दिवस बाजार सुरु असतो. शनिवार-रविवार कामकाज बंद असते. पण इतर काही दिवशी पण सण, कार्यक्रमानिमित्त शेअर बाजारात कोणते ही व्यवहार होत नाही. वर्षभरात या दिवशी बाजार बंद राहणार आहे.

एकूण 15 सुट्या स्टॉक मार्केटमध्ये या वर्षी 2023 मध्ये एकूण किती सुट्या आहेत. कोणत्या दिवशी कामकाज बंद असेल, याची यादी पूर्वीच जाहीर असते. बीएसईच्या संकेतस्थळावर सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, शनिवार-रविवारी बाजार बंद असतो. पण इतर सण, उत्सव, राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी बाजाराला सुट्या असतात. या वर्षभरात एकूण 15 दिवस सुट्या जाहीर आहेत. या दिवशी कोणतेही कामकाज होत नाही.

या दिवशी शेअर बाजार बंद 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिवस , 7 मार्च, होळी, 30 मार्च, राम नवमी, 4 एप्रिल, महावीर जयंती, 7 एप्रिल, गुड फ्राईडे, 14 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे, महाराष्ट्र दिवस, 29 जून, बकरी ईद या सुट्यांच्या दिवशी बाजार बंद होता.

हे सुद्धा वाचा

या दिवशी कामकाज नाही

  1. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन
  2. 19 सप्टेंबर, गणेश चतुर्थी
  3. 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती
  4. 24 ऑक्टोबर, दसरा
  5. 14 नोव्हेंबर, दिवळी, बळी प्रतिपदा
  6. 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
  7. 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस

रचला इतिहास बुधवारी, 28 जून रोजी प्री-ओपन सेशनमध्ये, बाजार उघडण्यापूर्वीच निफ्टीने 18900 अंकांचा पल्ला गाठला. गेल्या काही वर्षांपासून निफ्टी सातत्याने रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करत होता. सर्वकालीन उच्चांक गाठण्यासाठी कामगिरी सुरु होती. बुधवारी निफ्टीने मागील सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. उच्चांकी कामगिरी बजावत नवीन शिखर गाठले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्सने पण मुसंडी मारली.

सेन्सेक्सने तोडला रेकॉर्ड सेन्सेक्सने 63,701.78 अंकाचा उच्चांक गाठला. निफ्टीसोबत बीएसईने पण दमखम दाखवला. यापूर्वी 7 जून रोजी बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्सने (BSE Sensex) 350.08 अंकाची उसळी घेतली होती. बीएसई 63,142.96 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर 22 जून 2023 रोजी सेन्सेक्सने पुन्हा इतिहास घडवला होता. त्यावेळी बीएसई 63,601.71 अंकावर उघडला होता. शेअर बाजार अजून मोठी झेप घेईल, असा गुंतवणूकदारच नाही तर तज्ज्ञांना विश्वास आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....