एप्रिलपासून बदलणार कर नियम, काय होईल त्याचा फायदा

Income Tax Rules Explainer : 1 एप्रिल आता एकदम पुढ्यात आहे. नवीन आर्थिक वर्षाचा श्रीगणेशा या दिवसापासून होत आहे. आता काही नियमांत पण बदल होत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा कर नियमात बदल होत आहे. काय आहे हा बदल, त्याचा तुमच्या खिशावर काय होईल परिणाम?

एप्रिलपासून बदलणार कर नियम, काय होईल त्याचा फायदा
कर नियमात बदल, फायदा काय होणार Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 10:13 AM

वैयक्तिक अर्थनियोजनासाठी 1 एप्रिल हा महत्वाचा दिवस मानल्या जातो. कारण भारतात या दिवसापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. करदाते, सर्वसामान्य व्यक्ती या दिवसापासून कर बचतीपासून ते नवीन गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी सल्ला मसलत करतात. योजना आखतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अंतरिम बजेट नुकतेच सादर केले. तर पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होऊ शकतो. त्यावेळी पण कर नियमात बदल होऊ शकतो. सध्या या 1 एप्रिलपासून करासंबंधीच्या या नियमांत बदल होत आहे. त्याचा तुमच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?

1 एप्रिलपासून असे बदलतील कर नियम

नवीन कर प्रणाली डिफॉल्ट

हे सुद्धा वाचा

देशात आता नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. हीच व्यवस्था कायम करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार, आयकर भरत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की, तुम्हाला प्रत्येक वर्षी, 1 एप्रिलनंतर तुमची कर प्रणाली निवडावी लागेल. नाही तर आपोआप नवीन कर प्रणाली लागू होईल.

50,000 कर सवलत

जर तुम्ही पुढील आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये नवीन कर प्रणाली स्वीकाराल तर तुम्हाला 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनाचा फायदा मिळेल. ही सुविधा यापूर्वी केवळ जुन्या कर प्रणालीत उपलब्ध होती. हा नियम 1 एप्रिल 2023 रोजीपासून लागू झालेला आहे. करदात्यांना या 1 एप्रिल 2024 पासून नवीन कर प्रणाली स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे तुमची 7.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त होईल.

कर सवलतीच्या नियमांत हा बदल

नवीन कर प्रणालीत 1 एप्रिल 2023 रोजीपासूनच कर सवलतीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता 2.5 लाखांऐवजी 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर नवीन कर प्रणालीत कर Nil असतो. तर नियम -87A अंतर्गत टॅक्स रिबेट देण्यात येतो.तो 5 लाख रुपयांच्याऐवजी 7 लाख रुपये करण्यात आला आहे. जुन्या कर प्रणालीत Nil Tax मर्यादा 2.5 लाख रुपये तर टॅक्स रिबेट 5 लाख रुपये आहे.

कर रचनेत असा झाला बदल

  1. 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर
  2. 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, (आता 7 लाखांपर्यत टॅक्स रिबेट तर 50,000 रुपयांची मानक वजावटीचा फायदा )
  3. 6 लाख ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर
  4. 9 लाख ते 12 लाखांपर्यतच्या कमाईवर 15% कर
  5. 12 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर
  6. 15 लाख ते त्यापेक्षा अधिक उत्पन्नावर 30% टॅक्स
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.