Union Budget Share : बजेट काळात चौकार, हे चार शेअर करतील मालामाल, कमाईची संधी सोडता कशाला
Union Budget Share : अर्थसंकल्पाच्या काळात तुम्हाला कमाईची संधी मिळू शकते. त्यासाठी या शेअर्सवर तुमची अचूक नजर हवी.
नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) नवीन वर्षांपासूनच उलथापालथ पहायला मिळत आहे. नवीन वर्षात बाजाराने अनेकांना धोबीपछाड दिला. परदेशी गुंतवणूकदारांनीही (FII) गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेअर बाजारालाही अर्थसंकल्पाकडून (Union Budget 2023) खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बाजारा हिंदोळ्यावर असला तरी अर्थसंकल्पात बाजारासाठी काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ज्ञांसह गुंतवणूकदारांचेही अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील हे शेवटचे पूर्ण बजेट आहे. त्यामुळे केंद्र सरकार या बजेटमध्ये सर्वच घटकांना काहीतरी देण्याची शक्यता आहे. प्रत्येक घटकाला खूश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. संरक्षण, उत्पादन यासह इतर क्षेत्रासाठी मोठी घोषणा होऊ शकते. या सेक्टरमधील शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल.
इंजिनअरिंग आणि बांधकाम क्षेत्राला बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या उद्योगातील कंपन्यांना केंद्र सरकार मोठी आर्थिक मदत देईल, अशी आशा आहे. या क्षेत्रात लार्सन अँड ट्रब्रो (Larsen & Toubro) ही एक प्रमुख कंपनी आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.
देशात वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. केंद्र सरकारच्या वतीने वाहन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे. ग्रामीण भागात दुचाकीची मागणी मोठी आहे. त्यासाठी केंद्र सरकार काही मदत जाहीर करु शकते. त्याचा फायदा हिरो मोटोकॉर्पोला (Hero MotoCorp) होऊ शकतो.
या बजेटमध्ये केंद्र सरकार पायाभूत सोयी-सुविधांवर भर देऊ शकते. इन्फ्रास्ट्रक्चरवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो. या कंपन्यांमध्ये एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग ( HG Infra Engineering) या कंपनीचा शेअर कमाल करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार या अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेशी संबंधित कंपन्यांना मठा फायदा होऊ शकतो. रेल्वेच्या विकासाशी जोडलेली कंपनी IRCON ला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये त्यादृष्टीने घोषणा झाल्यास गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळू शकते.
हा केवळ तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला अजिबात नाही. गुंतवणुकीसंबंधी सल्ला देण्यात आलेला नाही. हा केवळ एक अंदाज आहे.