उद्यापासून ‘हे’ 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे बदलही होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. विशेषत: आर्थिक बाबींशी संबंधित या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बदल होणार आहेत. जाणून घेऊया.

केंद्रीय अर्थसंकल्प, उद्या अर्थात 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ते सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे बदलही होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. विशेषत: आर्थिक बाबींशी संबंधित या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बदल होणार आहेत. चला उद्यापासून लागू होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेऊया.
LPG सिलिंडरच्या दरात बदल होणार?
LPG सिलिंडरचे दर हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अपडेट केले जातात. तेल कंपन्या सुधारित दर जाहीर करतात. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आता 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच्या दिवशी LPG गॅसची किंमत वाढते की कमी होते हे पाहावे लागेल. जानेवारी महिन्यात काही बदलानंतर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती.
UPI व्यवहारांशी संबंधित नवे नियम
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI अंतर्गत काही व्यवहारांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांनुसार विशेष प्रकारचे कॅरेक्टर असलेले UPI ट्रान्झॅक्शन ID स्वीकारले जाणार नाहीत.
आता फक्त अल्फा-न्यूमेरिक (अक्षरे आणि अंक) ट्रान्झॅक्शन ID वैध असतील. एखाद्या व्यवहारात दुसऱ्या प्रकारचा ID असेल तर तो फेल होईल.
मारुती सुझुकीच्या कारच्या किमती तब्बल 10 हजारांनी वाढल्या
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) वाढत्या उत्पादन खर्चावर मात करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून आपल्या मॉडेल्सच्या किंमतीत 32,500 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. ज्या मॉडेल्सची किंमत बदलणार आहे. यामध्ये ऑल्टो K10, S-Pro, सेलेरियो, वॅगन आर, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा, इग्निस, बलेनो, सियाज, xl6, फ्रँक्स, इनव्हिक्टो, जिम्नी आणि ग्रँड व्हिटारा यांचा समावेश आहे.
बँकिंग नियमांमध्ये बदल
कोटक महिंद्रा बँकेने आपल्या काही सेवा आणि शुल्कात बदल करण्याची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. ATM व्यवहारांची फ्री लिमिट कमी करणे आणि इतर बँकिंग सेवांसाठी शुल्कात वाढ करणे हे मोठे बदल असू शकतात. या बदलांचा परिणाम बँक ग्राहकांवर होणार असून त्यांना या नव्या शुल्क रचनेसह आपल्या बँकिंग सेवेचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे.
ATM च्या दरात बदल एअर टर्बाइन फ्यूलच्या (ATF) किंमतीत 1 फेब्रुवारीपासून बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ATF च्या किंमतीत सुधारणा करतात. यावेळी दर वाढले तर त्याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.