दिवाळीत ग्राहकांची लॉटरी, या बँकांकडून मिळतय सर्वात स्वस्त होम लोन,कार लोनच्या दरातही मोठी कपात

जर तुम्हालाही स्वत:च्या हक्काचं घर घ्यायचं असेल, वाहन खरेदी करयचं असेल किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

दिवाळीत ग्राहकांची लॉटरी, या बँकांकडून मिळतय सर्वात स्वस्त होम लोन,कार लोनच्या दरातही मोठी कपात
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 7:47 PM

जर तुम्हालाही स्वत:च्या हक्काचं घर घ्यायचं असेल, वाहन खरेदी करयचं असेल किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकांकडून एफडीवर आकर्षक व्याजदराची ऑफर चालू आहे. तसेच तुम्हाला जर गृह किंवा वाहन कर्ज घ्यायचं असेल तर अनेक बँकांकडून अतिशय स्वस्त दरात ते उपलब्ध करून दिलं जात आहे. आज आपण अशाच काही बँकांची माहिती घेणार आहोत.

धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा सणोत्सवाच्या काळामध्ये अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना सध्या आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत.त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या मुहुर्तावर घर आणि वाहन खरेदीचा विचार करू शकता. बँक बाजारने दिलेल्या माहितीनुसार सध्या यूनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँण्ड सिंध बँक आणि आणखी काही बँकांकडून ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे.

बँक ऑफ बडोदा

होम लोन: बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना 8.40 टक्के व्याज दरानं होम लोन उपलब्ध करून दिलं जात आहे. ते देखील झिरो प्रोसेसिंग फी सोबत. तसेच कार लोन 8.95 टक्के व्याज दरानं दिलं जात आहे. पर्सन लोन 10.80 टक्के व्याज दरानं बँकेकडून मिळत आहे. बँक ऑफ बडोदाकडून फिक्स डिपॉजिटवर 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 एवढं व्याज देण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रकडून होम लोन 8.35 टक्के व्याज दरानं आणि ते देखील कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारता उपलब्ध करून दिलं जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कार लोन 8.70 टक्के व्याज दरानं देत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडिया देखील होम लोन अतिशय कमी दरामध्ये सध्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे, तसेच कार लोनवर देखील कोणतेही प्रोसेसिंग फी सध्या बँकेकडून आकारली जात नाहीये, तसेच एफडीवर देखील आकर्षक व्याज दर दिला जात आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....