Multibagger Share | या शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, 3 वर्षांत दिला 950 टक्के रिटर्न

Multibagger Share | या कंपनीचे मार्केट कॅप 29,729 कोटी रुपये आहे. कंपनीने एकूण 44 हजार शेअर्संनी बीएसईवर 32,901 कोटींचा व्यवसाय केला आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअरने 80.19 टक्क्यांची झेप घेतली आहे. कंपनीने मार्च तिमाहीत 7.2 टक्क्यांची वाढ केली आहे.

Multibagger Share | या शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, 3 वर्षांत दिला 950 टक्के रिटर्न
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 9:33 AM

नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात हजारो कंपन्या सूचीबद्ध आहेत. त्यांची प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर बाजारात आहेत. काही शेअर नुकसान करतात. तर काही शेअर एकदम लॉटरी लावतात. गुंतवणूकदारांना श्रीमंत करतात. या महासागरात अशा पण काही कंपन्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांना 15-20 वर्षांत नाही तर अवघ्या तीन वर्षांत छप्परफाड कमाई करुन देतात. या कंपनीने पण गुंतवणूकदारांना असेच मालामाल केले आहे. 3 वर्षांत दिला 950 टक्के रिटर्न दिला आहे. कोणती आहे ही कंपनी? गुंतवणूकदारांना अशी लागली लॉटरी..

ही आहे कंपनी

KPIT Technology या कंपनीने हा कारनामा केला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीनच वर्षात गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला आहे. तीनच वर्षात या कंपनीने ग्राहकांना 962 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे नशीब उघडले आहे. ज्यांनी तीन वर्षांपर्यंत गुंतवणूक टिकवून ठेवली त्यांना बंपर परतावा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

शेअर सध्या 1201 रुपयांवर

12 ऑक्टोबर 2020 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरची किंमत 113.45 रुपये होती. या तीन वर्षांत या शेअरने मोठा पल्ला गाठला. चालू सत्रात हा शेअर 1201 रुपयांवर व्यवसाय करत आहे. म्हणजे अवघ्या तीनच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 962 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ज्यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. त्यांचे तर नशीब उघडले आहे. त्यांना ही लॉटरीच लागली आहे.

615.40 रुपये शेअरचा निच्चांक

केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आत त्याचे मूल्य 21.14 लाख रुपये झाले असते. म्हणजे तीनच वर्षांत गुंतवणूकदाराला जॅकपॉट लागला असता. 12 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 1237.80 रुपयांवर होता. हा त्याचा उच्चांक आहे. तर गेल्यावर्षी 19 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 615.40 रुपयांच्या निच्चांकावर आला होता. या शेअरने सहा महिन्यात 40 टक्के परतावा दिला आहे. तर वर्षभरात या शेअरने 73 टक्के परतावा दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.