पामतेल बाजारात या शेअर्सचे ‘तेल’ काढणार!

वाढत्या महागाईचा फटका एफएमसीजी, कन्झ्युमर आणि क्यूएसआर क्षेत्राला बसला आहे. किंमती आटोक्यात ठेऊन गळेकापू स्पर्धेत उभं ठाकायचे आव्हान या क्षेत्रातील कंपन्यांना समोर आहे. आता पामतेलासाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याने या कंपन्यांसमोर दिवसा काजवे चमकणार आहे.

पामतेल बाजारात या शेअर्सचे 'तेल' काढणार!
खाद्यतेलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:17 PM

इंडोनेशियातून पामतेलाच्या निर्यातीवर बंदी (ban on export) घातल्याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असून, ही जगातील सर्वात मोठी वनस्पती तेलांची (vegetable oils) आयात भारतात होते. वाढत्या महागाईचा फटका एफएमसीजी, कन्झ्युमर आणि क्यूएसआर क्षेत्राला बसला आहे. किंमती आटोक्यात ठेऊन गळेकापू स्पर्धेत उभं ठाकायचे आव्हान या क्षेत्रातील कंपन्यांना समोर आहे. पामतेल हे इतर खाद्यतेलांपैकी तुलनेने स्वस्त तेल आहे. पण निर्यात बंदीच्या या निर्णयामुळे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल अशा अन्य खाद्यतेलांच्या (edible oils) किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहेआता पामतेलासाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याने या कंपन्यांसमोर दिवसा काजवे चमकणार आहे. तर या कंपन्यांच्या बाजारातील स्टॉकचे (stocks) ही तेल निघणार आहे. एफएमसीजी (FMCG), ग्राहक आणि क्यूएसआरसाठी (QSR) या क्षेत्रातील शेअर्सना मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे.

पामतेल हे जगातील सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे वनस्पती तेल आहे. शीर्ष चार खाद्यतेलांच्या पुरवठ्यात त्याचा वाटा सुमारे 40 टक्के इतका आहे. 2020 आणि 2021 मध्ये आग्नेय आशियातील शेतकऱ्यांसह मजुरांनी या वनस्पतीची लागवड कमी केल्याने जागतिक पाम तेलाचे उत्पादन (Global palm oil production) घसरले आहे.

पामतेल हे इतर खाद्यतेलांपैकी तुलनेने स्वस्त तेल आहे. या निर्णयामुळे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल अशा अन्य खाद्यतेलांच्या (edible oils) किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे,’ असे प्रभुदास लिलाधर यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

बाजारातील तज्ञांचा असा विश्वास आहे की खाद्यतेलांच्या कमतरतेमुळे बिस्किटे, केक, साबण आणि शैम्पू सारख्या एफएमसीजी विभागांवर परिणाम होईल, या उद्योगात पाम तेल हे महत्वाचा घटक आहे. किंमत वाढीमुळे एफएमसीजी उद्योगाला नफ्यात घट दिसून येईल आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होईल.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की, एचयूएल, गोदरेज कन्झ्युमर, आयटीसी आणि ब्रिटानिया या कंपन्यांना या कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

खर्चाचे गणित बसविण्यासाठी कंपन्या भाव वाढ करतील आणि खर्चाचा बोजा ग्राहकांवर लादतील ,परंतु कच्च्या तेलाच्या किंमती उसळल्यामुळे, पॅकेजिंगच्या वाढत्या किंमतीमुळे एफएमसीजी क्षेत्र आधीच संघर्ष करत आहे, तेव्हा ही भाववाढ या उद्योगांसाठी जिकरीची ठरेल.

सर्वात मोठा आयातदार देश असल्याने दरवर्षी ८० लाख टन पामतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत इंडोनेशिया आणि मलेशियासारख्या आशियाई देशांवर अवलंबून आहे.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे (Swastika Investmart )संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले की, भाववाढीच्या गोंधळामुळे (HUL), नेस्ले(Nestle), ब्रिटानिया(Britannia), गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स(Godrej Consumer Products), मॅरिको (Marico)यासारख्या एफएमसीजी कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.