AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : करा घाई, आता पुन्हा संधी नाही! या करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, नाहीतर कारवाई

Income Tax : करदात्यांसाठी आता शेवटची संधी उरली आहे. त्यांना कर भरण्यासाठी लगबग करावी लागणार आहे. नाहीतर ही संधी सुटल्यास समोरील प्रक्रियेला त्यांना सामोरं जावं लागू शकते.

Income Tax : करा घाई, आता पुन्हा संधी नाही! या करदात्यांसाठी दिवस उरलेत फक्त काही, नाहीतर कारवाई
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 4:22 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष (Financial Year) 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत आता जवळ येऊन ठेपली आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कालावधीत तुम्हाला तुमचे जुने प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return-ITR) दाखल करता येतील. करदात्यांनी वेळीच आयटीआर दाखल केला नाहीतर त्याला संधी देण्यात येते. ही संधी चुकवली तर मात्र त्याला कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येते. केंद्र सरकारने सध्या कर भरण्यासाठी दोन प्रणाली सुरु केल्या आहेत. जुनी कर पद्धत (Old Tax Regime) आणि नवीन कर पद्धत (New Tax Regime) . जुन्या कर पद्धतीत आयकरदात्याला करपात्र उत्पन्नावर कर सवलतीची संधी मिळते.

प्राप्तिकर रिटर्न

आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 ही होती. ज्या करदात्यांनी या निश्चित तारखेला कर जमा केला नाही, त्यांच्यासाठी 31 डिसेंबरला रिटर्न जमा करण्यासाठी संधी देण्यात आली होती. ही अंतिम तारीख होती. मूळ रिटर्नमध्ये काही त्रुटी असल्यास, त्यात सुधारणा करण्याची करदात्यांना संधी देण्यात आली. या सुधारीत आयटीआर फाईल करण्यासाठी एक निश्चित कालावधी देण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

अजून एक संधी

परंतु, काही करदात्यांना ही संधी ही साधता आली नाही. त्यांच्यासाठी पुन्हा आयटीआर फाईल करण्याची संधी देण्यात आली. केंद्र सरकारने बजेट 2022 मध्ये ITR-U , सुधारीत आयकर रिटर्न आणले. मूल्यांकन वर्षांच्या (AY) 2 वर्षांच्या आत आयटीआर दाखल करण्याची सुविधा देण्यात आली. या काळात जुना आयटीआर दाखल करता येईल.

ITR-U म्हणजे काय

आयटीआर-यु सह एक करदाता कोणत्याही उत्पन्नाचा रिपोर्ट देऊ शकतो. पण त्याने ही माहिती गेल्या आयकर रिटर्नमध्ये द्यायला नको. ज्यांनी वेळेत रिटर्न दाखल केला नाही. सुधारीत रिटर्न दाखल केला नाही, त्यांच्यासाठी पण हा एक चांगला पर्याय आहे. एखाद्या आर्थिक वर्षात आयटीआर बंद झाले नसेल तर अशा परिस्थितीत या सुविधेचा वापर करता येतो.

दंडाची तरतूद

ITR-U दाखल करणाऱ्या व्यक्तीला दंड रुपाने व्याजाची रक्कम भरावी लागते. आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR-U पहिल्या संबंधित मूल्यांकन वर्षात – म्हणजे एप्रिल 1, 2023 आणि 31 मार्च, 2024 दरम्यान भरला असेल. जर ITR-U 1 एप्रिल, 2024 आणि मार्च दरम्यान दाखल केला असेल 31, 2025 नंतर थकीत करावर 50 टक्के अतिरिक्त कर भरावा लागतो.

अपडेटेड रिटर्न दाखल करण्यासाठी अटी आहेत. त्यानुसार, यापूर्वी एखाद्या व्यक्तीने कोणताही आयटीआर दाखल केला नसेल, त्याच्याकडे कोणताच प्राप्तिकर थकलेला नसेल, तर त्याला अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न भरता येतो. परंतु, कलम 234F अंतर्गत रिटर्न उशीरा दाखल केल्याने त्या करदत्याला दंड द्यावा लागतो. त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही होते.

अंतिम तारखेचे गणित काय

  1. मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी ITR-U ची अंतिम मुदत 31 मार्च, 2023 आहे.
  2. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी अंतिम तारीख मार्च, 2024 ही आहे.
  3. मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ही अंतिम तारीख 31 मार्च 2025 ही आहे.
  4. यंदा मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी सुधारीत आयटीआर दाखल करता येईल.
  5. करदात्यांना त्यासाठी 31 मार्च, 2023 ही अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली आहे.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.