Dividend Stocks | गुंतवणूकदारांना देवी पावली, एका शेअरवर 20 रुपये लाभांश

Dividend Stocks | बाजार बंद होताच, या कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषीत केला. कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. या कंपनीने एका शेअरवर 20 रुपयांचा Dividend देण्याची घोषणा केली. या कंपनीच्या महसूलात चांगलीच वाढ झाली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 8,905.4 कोटींची उलाढाल झाली.

Dividend Stocks | गुंतवणूकदारांना देवी पावली, एका शेअरवर 20 रुपये लाभांश
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 6:48 PM

नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : अनेक कंपन्यांनी त्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्यांना कमी पल्ला गाठता आला तर काहींनी मोठी झेप घेतली. महसूलात जोरदार वाढ झाल्याने, नफ्याचा आलेख उंचावल्याने या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजार बंद होताच जाहीर केले. या कंपनीने या आर्थिक वर्षात 8,905.4 कोटींची उलाढाल केली. या कंपनीच्या नफ्यात जोरदार वाढ झाली. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 20 रुपयांचा Dividend देण्याची घोषणा केली. लवकरच लाभांश त्यांच्या खात्यात जमा होईल.

नफ्यात मोठी झेप

कंपनीने निकाल घोषीत केले. त्यात कंपनीचा नफा 1152 कोटीहून 1162 रुपये झाल्याचे समोर आले आहे. अंदाजापेक्षा नफ्याचे गणित चांगले जमल्याने कंपनीने गुंतवणूकदारांना पण त्याचा फायदा मिळवून दिला. कंपनीला 1130 कोटी रुपये नफा मिळण्याचा अंदाज होता. कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली. प्रति शेअर 20 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी पण कंपनीने दिला डिव्हिडंड

दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषीत करताना प्रति शेअर 20 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. यापूर्वी पण कंपनीने 10 जुलै 2023 रोजी 40 रुपये, 31 जानेवारी 2023 रोजी 20 रुपये, 30 जून 2022 रोजी 30 रुपयांचा लाभांश दिला आहे. 25 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीने 15 रुपयांचा लाभांश दिलेला आहे. कंपनीने या लाभांशसाठी 27 ऑक्टोबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

कंपनीची कामगिरी

कंपनीची कमाई जोरदार आहे. तिमाही आधारावर कंपनीची कमाई 8,702 कोटींहून 8,905 कोटीपर्यंत वाढली आहे. कंपनीचे EBIT 1,450.8 कोटींहून घसरुन 1,423.1 कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीचे EBITDA मार्जिन 16.7 टक्क्यांवरुन 16 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

ही आहे कंपनी

LTI Mindtrees असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी Larsen & Toubroची उपकंपनी आहे. कंपनीने 2000 शेअर अलोट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांना 23,928 शेअर देण्याचा पर्याय समोर ठेवला आहे. कंपनीच्या खास योजनेतंर्गत ही व्यवस्था करण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.