हवाला रॅकेट चालते तरी कसे, पाकिस्तानपर्यंत असे फिरते ‘रिंग’

Hawala | 'महादेव बेटिंग ॲप'ने सेलिब्रिटीपासून ते राजकारण्यांपर्यंत हादरे बसत आहे. छत्तीसगडच्या राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. या प्रकरणाचे कनेक्शन आता थेट दाऊद गँग आणि हवाला व्यापाराशी जुळत असल्याचे समोर येत आहे. काय आहे हे हवाला रॅकेट, ते चालते तरी कसे, त्याचा कसा होतो वापर?

हवाला रॅकेट चालते तरी कसे, पाकिस्तानपर्यंत असे फिरते 'रिंग'
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 1:59 PM

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : ‘हवाला’ या शब्दाचा अर्थ होतो, एखाद्या व्यक्तीवर, गोष्टीवर विश्वास ठेवणे. हवाला व्यापाराचा मूळ पायाचा विश्वासवर टिकून आहे. पैशांच्या व्यवहाराची ही पद्धत अनेक शतकांपासून सुरु आहे. केवळ विश्वासावर चालणार हा व्यवसाय कोट्यवधी, अब्जावधींचा आहे. हा व्यवहार झटपट आणि गुप्तपणे चालतो. जगभरातील सरकारे आणि तपास संस्थांच्या नजरेत धूळपेक करत हा व्यवहार चालतो. त्यासाठी हवालाचा वापर करण्यात येतो. हवालामार्फत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

सिल्क रुटचा वापर

हवाला व्यापाराचा इतिहास जूना आहे. हजारो वर्षांपूर्वी चीनपासून ते आखाती देश आणि पुढे युरोपीय देशापर्यंत सिल्क रुट होता. या मार्गावरुन व्यापार होत होता. भारत पण याच मार्गाने व्यापार करत असे. ऊंटाचा या मार्गावर वापर होत असे. ऊंटावर बसून व्यापारी हा लाबं पल्ला गाठत असत. रस्त्यात त्यांना चोरांचा, डाकू यांचा सामना करावा लागत असे. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचवेळी पैशांच्या सुरक्षेसाठी हवाला व्यापाराची सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा

कसा होतो हवाला व्यापार?

हा व्यापार पूर्णपणे विश्वासावर चालतो. शब्दावर चालतो. एकदा शब्द दिला की काम फत्ते. समजा, तुम्हाला दिल्लीवरुन जवळपास 100 कोटी रुपयांची रक्कम चेन्नईत पोहचवायची आहे. बँकेमार्फत ही रक्कम पोहचवण्यासाठी अनेक चौकशा, ओळखपत्र आणि शुल्क अदा करावे लागेल. तुमच्यावर सरकारी एजन्सी नजर ठेवतील तो भाग वेगळा. अशावेळी ही रक्कम हवाला व्यापारी काही तासातच चेन्नईत पोहचवतील. एजंटमध्ये नेटवर्क असते. त्यावर हवाला व्यापार चालतो.

असा चालतो व्यापार

तुम्ही एजंटला 100 कोटी रुपये दिल्यानंतर तुम्हाला एक कोड देण्यात येतो. हा कोड म्हणजे तुमचा पासवर्ड आहे. चेन्नईतील एजंटला हा कोड पाठविण्यात येतो. तो कोणताही प्रश्न न विचारता तुम्हाला 100 कोटी रुपये देईल. कोणताही बोभाटा न होता, काही तासताच ही रक्कम एका कोडवर तुम्हाला चेन्नईत मिळेल. तुम्हाला कोणताही प्रश्न विचारण्यात येणार नाही. प्रत्येक लाखांमागे ठरलेले कमिशन तुम्हाला द्यावे लागते. हीच त्याची कमाई असते.

महादेव ॲपपासून दाऊदपर्यंत कनेक्शन

‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणात ईडीने तपास केला. त्यात अशा ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून मालक दर दिवशी 200 कोटी रुपयांची कमाई करत असल्याचे समोर आले. या ॲपचे मालक दुबईतून काम करतात. त्यामुळे ही रक्कम हवालाच्या माध्यमातून दुबईत पोहचते. या कामात त्यांची मदत दाऊद गँग आणि इतर जण करतात. ही रिंग पाकिस्तानपर्यंत फिरते.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....