Expensive Currency : डॉलर, पाऊंड तर या करन्सीपुढे फिक्के, जगात हेच चलन सर्वात महागडे

Expensive Currency : जगातील सर्वात महागडे चलन कोणते आहे हे विचारल्यास, तुम्ही लागलीच अमेरिकन डॉलर अथवा इंग्लंडचा पाऊंड आहे, असे तुम्ही म्हणाल, पण यापेक्षा या देशाचे चलन सर्वात महागडे आहे. कोणती आहेत ही चलन..

Expensive Currency : डॉलर, पाऊंड तर या करन्सीपुढे फिक्के, जगात हेच चलन सर्वात महागडे
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली : जगात सर्वात शक्तीशाली देश म्हणजे अमेरिका आहे, हे वेगळं सांगायला नकोच. या महासत्ताचे चलन डॉलर (Dollar) आहे. हेच चलन सर्वात महागडे असेल. अथवा अर्ध्याहून अधिक जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडचे पाऊंड हे चलन सर्वात महागडे चलन असेल, असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण 90 टक्के जागतिक व्यापार आजही डॉलरमध्येच होतो. त्यामुळे डॉलरला अनन्यसाधारण महत्व आहे. पण जगातील सर्वात महागडे चलन (Expensive Currency) युरोप अथवा अमेरिका खंडातील नाही. डॉलर आणि पाऊंड सुद्धा या चलनापुढे फिक्के आहेत. कोणत्या देशाचे आहेत, ही महाग चलन?

आखाती देश मजबूत जगातील सर्वात महागडी करन्सी अर्थातच युरोप अथवा अमेरिकन खंडातील नाही तर आखाती प्रदेशातील आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसचे मोठे साठे यामुळे या देशाचे चलन सर्वाधिक महागडे आहे.

हे सुद्धा वाचा

हे आहे सर्वात महागडे चलन कुवेत या देशाचे चलन दिनार हे जगातील सर्वात महागडे चलन आहे. डॉलर पुढे भारतीय रुपयाने लोटांगण घेतले आहे. दिनार तर भारतीय रुपयापेक्षा खूपच महागडे आहे. कुवेतचे 1 दिनार खरेदी करण्यासाठी भारतीय नागरिकाला जवळपास 267 रुपये द्यावे लागतील. तर 3.25 डॉलर खर्च करावे लागतील. कुवेत हा मोठा कच्चे तेल निर्यात करणारा देश आहे. या देशाची जवळपास अर्धी जीडीपी तेलावर आधारीत आहे.

बहारीन दिनार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बहारीनचा दिनार आहे. एक बहारीन दिनार भारतीय 217 रुपये आणि 2.65 डॉलर खर्ची करुन खरेदी करता येईल. या देशाची अर्थव्यवस्था क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅसवर अवलंबून आहे. जगभरातील अब्जाधीशांचा पैसा येथील बँकिंग सेवांसाठी वापरण्यात येतो. येथील सरकारचा 85 टक्के महसूल यावरच अवलंबून आहे.

ओमान रियाल ओमान देशाचे चलन रियाल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आखाती देश असला तरी याचा काही भाग आशियात येतो. नैसर्गिक गॅस आणि कच्चा तेलावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. एक ओमानी रियाल खरेदी करण्यासाठी भारतीय नागरिकांना 214 रुपये तर अमेरिकन नागरिकाला 2.60 डॉलर खर्च करावे लागतील.

जॉर्डन दिनार जॉर्डनचा दिनार हा जगातील चौथी मोठी करन्सी आहे. जॉर्डन हा पश्चिम आशियातील महत्वाचा देश आहे. आर्थिकदृष्ट्या हा देश सक्षम नाही. इतर देशात गेलेले जॉर्डनचे नागरीक या देशात पैसा पाठवतात. भौगोलिकदृष्ट्या याचे स्थान महत्वाचे आहे. व्यापारावर या देशाची गुजराण होते. 1 जॉर्डन दिनार खरेदीसाठी भारतीय नागरिकाला 115.52 रुपये खरेदी करावे लागतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.