भारतातील सर्वात महागडी कार अंबानी किंवा टाटांकडे नव्हे या असामीकडे आहे, पाहा ती व्यक्ती कोण ?
भारतात अनेक अब्जाधीश रहातात. रिलायन्सचे मुकेश अंबानी तसेच अदर पुनावाला यांना महागड्या कार पदरी बाळगण्याचा शौक आहे. परंतू भारतातील महागडी कार एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या पदरी आहे.
मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतात रहाते. ती म्हणजे अब्जाधीश मुकेश अंबानी होत. सर्वात महागडे घर अंबानी यांचे असल्याचे म्हटले जाते. परंतू देशातील सर्वात महागडी कारचा विषय निघाला तर त्यात त्यांचे नाव नाही हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढंच काय गौतम अदानी असोत की रतन टाटा भारतातील महागडी कार त्यांच्याकडे नाही. देशातील सर्वात महागडी कार एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे आहे. त्या व्यक्तीचे नाव काय पाहूयात ? भारतात अनेक अब्जाधीश रहातात. मुकेश अंबानी आणि अदर पुनावाला यांना महागड्या कार पदरी बाळगण्याचा शौक आहे. त्यांच्यातील काहीकडे महागडी घरे आहेत. आलिशान महागड्या कार आहेत. त्यांच्याकडील संपत्तीमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत त्यांची नावे येतात. परंतू भारतातील सर्वात महागडी कार ब्रिटीश बायोलॉजिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.रेड्डी यांच्याकडे आहे.
ब्रिटीश कार निर्माते बेंटले हे महागड्या आणि कार ब्रॅंडचे निर्माते म्हणून ओळखले जात असून त्यांच्या बेंटले कारचे चाहते जगभर आहेत. Cartoq.com या वेबसाईटच्या म्हणण्यानूसार सध्याच्या घडीला बेंटलेची Bentley Mulsanne EWB Centenary Edition ही कार देशातील सर्वात महागडी कार आहे. या गाडीची किंमत तब्बल 14 कोटी रुपये इतकी आहे. ब्रिटीश बायोलॉजीकल्सचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एस. रेड्डी या बेंटले कारची युनिक लिमिटेड एडीशन आहे. ब्रिटीश लक्झरी कार मॅन्युफॅक्चरर बेंटले यांच्या 100 अॅनिव्हसरी निमित्त या मॉडेलची लिमिटेड एडीशन जारी झाली होती. या बेंटले ब्रॅंडने जगात केवळ 100 कारची मॉडेल्स निर्माण केली होती. 6.75 लिटर v8 इंजिन, 506 हॉर्स पॉवर आणि 1020 Nm इंजिनाची क्षमता असलेली ही कार अवघ्या 5.5 सेंकदात 0 ते 100 प्रति किमी वेग पकडते. या गाडीचा कमाल वेग दर ताशी 296 किमी इतका आहे.
मर्जीनूसार मॉडीफाय केली
ब्रिटीश बायोलॉजीक्सचे व्ही.एस.रेड्डी हे महागड्या लक्झरी कारचे शौकीन आहेत. जगातील प्रत्येक ब्रॅंडची कार आपल्याकडे असावी असे आपले लहानपणी स्वप्न होते असे रेड्डी म्हणतात. बंगळुरु स्थित व्ही.एस.रेड्डी यांनी त्यांच्या Bentley Mulsanne EWB Centenary Edition ला त्यांच्या मर्जीनूसार मॉडीफाय केले आहे. व्ही.एस.रेड्डी यांनी विविध वयोगटातील व्यक्तींना वाजवी दरात न्युट्रीशियन, प्रोटीन मिळावे म्हणून ब्रिटीश बायोलॉजीकल कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी ‘प्रोटीन पिपल्स’ ही हेल्थकेअर सप्लीमेंट कंपनी स्थापन केली असून ती संशोधन करीत असते. ही कंपनी बालरोग, मधुमेह, स्त्रीरोग, हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी, हिपॅटायटीस आणि जेरियाट्रिक वैद्यकीय पोषणासाठी पौष्टिक पदार्थ तयार केले आहेत. ब्रिटिश बायोलॉजिकल उत्पादनांचा आरोग्यासाठी उत्तम परिणाम होतो.