Petrol-Diesel Price : काडेपेटीपेक्षा स्वस्त पेट्रोल, 60 रुपयांतच टाकी फुल्ल! भारतात नाही इथं मिळतंय हे सुख
Petrol-Diesel Price : या देशात अवघ्या काही रुपयांना, काडेपेटीपेक्षाही स्वस्तात पेट्रोल-डिझेल मिळतंय, अवघ्या 60 रुपयांमध्ये या देशात वाहनाची टाकी फुल्ल होते, जगाच्या पाठीवर असे सुख कोणत्या देशात आहे, माहिती आहे का?
नवी दिल्ली : भारतात अनेक राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे, तर डिझेलच्या 100 रुपयांच्या जवळपास आहे. गेल्या वर्षभरात या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांना सर्वात शेवटी गेल्या एप्रिल महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) बदल केला होता. मे महिन्यांत केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क घटवले होते. त्याचा काहीसा दिलासा चाकरमान्यांना मिळाला होता. पण आता पेट्रोलियम कंपन्या नफ्यात असताना त्याचाच तसूभरही फायदा भारतीय वाहनधारकांना मिळताना दिसत नाही. पण या देशात अवघ्या काही रुपयांना, काडेपेटीपेक्षाही (Matchbox) स्वस्तात पेट्रोल-डिझेल मिळतंय, अवघ्या 60 रुपयांमध्ये या देशात वाहनाची टाकी फुल्ल होते, जगाच्या पाठीवर असे सुख कोणत्या देशात आहे, माहिती आहे का?
महागाईची झळ World of Statistics नुसार, जगात सर्वात महाग पेट्रोल लेबनॉन या देशात मिळते. एका लिटरसाठी भारतीय चलनात 503.59 रुपये मोजावे लागतात. हाँगकाँगचा दुसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी पेट्रोल प्रति लिटर 2.96 डॉलर, सिंगापूरमध्ये 2.74 डॉलर, आईसलँडमध्ये 2.39 डॉलर, डेनमार्कमध्ये 2.3 डॉलर, फ्रान्समध्ये 2.2 डॉलर, इटलीमध्ये 2.16 डॉलर, नेदरलँडमध्ये 2.16 डॉलर, फिनलँडमध्ये 2.15 डॉलर, ग्रीसमध्ये 2.15 डॉलर, नॉर्वेमध्ये 2.13 डॉलर, जर्मनीमध्ये 2.02 डॉलर, स्वीडनमध्ये 2.01 डॉलर आणि बेल्जियम या देशात दो डॉलर प्रति लिटर पेट्रोल मिळते.
भारतापेक्षा महाग इंधन युरोपियन देश स्वित्झर्लंडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 1.95 डॉलर, ब्रिटेनमध्ये 1.83 डॉलर, ऑस्ट्रियामध्ये 1.82 डॉलर, स्पेनमध्ये 1.82 डॉलर, पोलँडमध्ये 1.63 डॉलर, तुर्की या देशात 1.46 डॉलर, ऑस्ट्रेलियामध्ये 1.27 डॉलर, जापानमध्ये 1.26 डॉलर, दक्षिण आफ्रिकेत 1.25 डॉलर,दक्षिण कोरीयात 1.24 डॉलर आणि कॅनाडा देशात 1.21 डॉलर प्रति लिटर भाव आहे. भारतात हा भाव 1.18 डॉलर प्रति लिटर आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 0.99 डॉलर प्रति लिटर आहे. तर चीन आणि अमेरिकेत हा भाव 0.95 डॉलर प्रति लिटर आहे.
सर्वात स्वस्त पेट्रोल या देशात जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये मिळते. या देशात एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला केवळ 0.02 डॉलर 1.65 रुपये खर्च करावा लागतो. या देशातील एक लिटर पेट्रोलचा खर्च भारतीय काडेपेटीपेक्षा स्वस्त आहे. म्हणजे भारतीय चलनात 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही 30 लिटर पेट्रोल खरेदी करु शकता. या देशात मारुती सुझुकी ऑल्टो के10 (Maruti Suzuki Alto K10) ची 35 लिटर टाकी फुल्ल करण्यासाठी तुम्हाला फारतर 57.75 रुपये खर्च करावे लागतील.
प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.