ही रिअल इस्टेट कंपनी 1000 जणांना देणार नोकऱ्या, सर्व पदांवर नव्या कर्मचाऱ्यांची भरती

कॉलियर्स इंडियाचे प्रमुख म्हणून, कॅनडास्थित सल्लागार कंपनी कॉलियर्सची भारतीय उपकंपनीचे नायर म्हणाले की, कर्मचारी संख्या वाढवणे, योग्य कार्यसंस्कृती अंगीकारणे, आपल्या ब्रँडचे मार्केटिंग करणे, नवनवीन तंत्रज्ञान लागू करणे आणि आपला ग्राहक वाढवणे महत्त्वाचे आहे. नायर म्हणाले, आम्ही आमच्या ताकदीला चिकटून राहू.

ही रिअल इस्टेट कंपनी 1000 जणांना देणार नोकऱ्या, सर्व पदांवर नव्या कर्मचाऱ्यांची भरती
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 4:36 PM

नवी दिल्लीः भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आक्रमक रणनीती आखत कॉलियर्स या अग्रगण्य रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने पुढील वर्षी 1,000 पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. Colliers India चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रमेश नायर म्हणाले की, पुढील वर्षी कंपनी भारतात सुमारे 1,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याव्यतिरिक्त जानेवारीमध्ये दोन नवीन सेवा सुरू करणार आहे. भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्याच्या कंपनीच्या आक्रमक धोरणाचा हा एक भाग आहे.

सल्लागार कंपन्यांपैकी एक बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आखली रणनीती

नायर म्हणाले की, नफ्याच्या बाबतीत कॉलियर्स इंडियाला देशातील पहिल्या तीन रिअल इस्टेट सल्लागार कंपन्यांपैकी एक बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही रणनीती अवलंबण्यात आली. या वर्षी जुलैमध्येच नायर या कंपनीचे सीईओ बनले.

आपला ग्राहक वाढवणे महत्त्वाचे

कॉलियर्स इंडियाचे प्रमुख म्हणून, कॅनडास्थित सल्लागार कंपनी कॉलियर्सची भारतीय उपकंपनीचे नायर म्हणाले की, कर्मचारी संख्या वाढवणे, योग्य कार्यसंस्कृती अंगीकारणे, आपल्या ब्रँडचे मार्केटिंग करणे, नवनवीन तंत्रज्ञान लागू करणे आणि आपला ग्राहक वाढवणे महत्त्वाचे आहे. नायर म्हणाले, आम्ही आमच्या ताकदीला चिकटून राहू. आम्ही देशातील सर्वात मोठी प्रकल्प व्यवस्थापन कंपनी आहोत. आता आम्हाला ऑफिस, इंडस्ट्रियल आणि वेअरहाऊस आणि कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये आमचा मार्केट शेअर वाढवण्याची गरज आहे.

सर्व पदांवर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार

यासाठी सर्व स्तरावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सध्या कॉलियर्स इंडियामध्ये सुमारे 3,000 कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील वर्षी एक हजार नवीन भरती करण्याचे नियोजन आहे. कंपनी जानेवारी 2022 मध्ये दोन नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तपशील दिलेला नसला तरी व्यवसाय विकासासोबतच खाते व्यवस्थापनावर कंपनी भर देत राहील, असे सांगितले.

रिअल इस्टेट क्षेत्र कोविड 19 मधून सावरतंय

ते म्हणाले की, आता रिअल इस्टेट क्षेत्र कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून बऱ्यापैकी सावरताना दिसत आहे. निवासी क्षेत्राव्यतिरिक्त ऑफिस आणि शॉपिंग मॉल्समध्येही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. ते म्हणाले की, कोविड लसीकरणाचा वेग आणि सुधारलेली आर्थिक परिस्थिती याला बळकटी देत ​​आहे.

संबंधित बातम्या

PNB ग्राहकांना अलर्ट, 18 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा 7 महिन्यांपर्यंत धोक्यात

नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी| EPF नॉमिनेशन ऑनलाईन बदलता येणार, पण कसे?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.