तब्बल 60 हजार कोटींनी गुंतवणूकदार झाले मालामाल, ‘या’ आहेत टॉपच्या कंपन्या

पहिल्या दहा मूल्यमापन कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे ( Sensex market cap) भांडवल गेल्या आठवड्यात 60,198.67 कोटी रुपयांनी वाढलं आहे.

तब्बल 60 हजार कोटींनी गुंतवणूकदार झाले मालामाल, 'या' आहेत टॉपच्या कंपन्या
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 7:44 PM

नवी दिल्ली : देशातील पहिल्या दहा मूल्यमापन कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे ( Sensex market cap) भांडवल गेल्या आठवड्यात 60,198.67 कोटी रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फायदा मिळाला आहे. अधिक माहितीनुसार, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये सर्वाधिक वाढ झाली. इतकंच नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (एचयूएल), इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि भारती एअरटेल देखील या आठवड्यात फायद्यामध्ये आहे. दुसरीकडे एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचं बाजार मूल्य घटल्याचं सांगण्यात येत आहे. (this week sensex top 10 companies market cap rose by 60198 crore )

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे बाजार भांडवल (एमसीएपी) 19,849.41 कोटी रुपयांनी वाढून 5,26,627.07 कोटींवर पोहोचलं आहे. टीसीएसचा एमसीएपी 17,204.68 कोटी रुपयांनी वाढून 10,91,362.33 कोटी रुपये झाला तर एचयूएलची बाजारपेठ 16,035.72 कोटी रुपयांनी वाढून 5,63,881.75 कोटी रुपयांवर गेली आहे. भारती एअरटेलचं बाजार भांडवल 3,518.83 कोटी रुपयांनी वाढून 2,82,079.59 कोटी रुपये झालं तर कोटक महिंद्रा बँक 2,544.02 कोटी रुपयांनी वाढून 3,88,414.04 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

रिलायन्सची मार्केट कॅप 12.64 लाख कोटींवर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 1,046.01 कोटी रुपयांचा एमसीएपी वाढून 12,64,021.09 कोटी रुपयांवर गेला आहे. तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन 7,755 कोटी रुपयांनी घसरून 7,69,364.60 कोटी रुपयांवर आलं आहे. यामध्ये एचडीएफसीचे बाजार भांडवल 4,445.63 कोटी रुपयांनी घसरून 4,41,728.42 कोटी रुपयांवर गेले. बजाज फायनान्सचे मूल्यांकन 4,121.69 कोटी रुपयांनी घसरून 3,12,360.19 कोटी आणि आयसीआयसीआय बँकेचे एमसीएपी 2,263.57 कोटी रुपयांनी घसरून 3,54,590.10 कोटी रुपयांवर गेले.

दुसऱ्या क्रमांवर पोहोचली टीसीएस

सर्वाधिक रेट केलेल्या कंपन्यांमध्ये आरआयएल अव्वल आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, एचयूएल, इन्फोसिस, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेलचा नंबर लागतो. (this week sensex top 10 companies market cap rose by 60198 crore )

संबंधित बातम्या –

टीव्ही आणि फ्रीज आताच खरेदी करा, नव्या वर्षात ‘इतक्या’ किंमती वाढणार

Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!

घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान

(this week sensex top 10 companies market cap rose by 60198 crore )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.