Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आठवड्यात बाजारात तीन आयपीओंचा बोलबोला; 2,387 कोटी रुपयांच्या तीन आयपीओकडे गुंतवणुकदार साधणार ‘लक्ष्य’ !

या तीन प्रारंभिक सार्वजनिक ऑफर्सने (IPO) एकूण सुमारे 2, 387 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रदीप फॉस्फेट्स आपल्या आयपीओच्या माध्यमातून 1,502 कोटी रुपये उभारणार आहे, तर इथोस आयपीओच्या माध्यमातून 472 कोटी रुपये आहे. तर ई-मुद्रा आयपीओच्या माध्यमातून 412.79 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

या आठवड्यात बाजारात तीन आयपीओंचा बोलबोला; 2,387 कोटी रुपयांच्या तीन आयपीओकडे गुंतवणुकदार साधणार 'लक्ष्य' !
एलआयसी आयपीओImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 3:25 PM

गेल्यावर्षात पेटीएमसह झोमॅटो, नायकासारख्या मोठ्या कंपन्यांच्या आयपीओने चर्चेचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. 2021 मध्ये 42 कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले होते. यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच मिशन एलआयसी (Mission LIC IPO) सुरू होते. या मेगा आयपीओसाठी सरकारने भरभक्कम वातावरण तापवले, आता तीन नवीन आयपीओंचा बाजारात बोलबाला होत आहे. प्रदीप फॉस्फेट्स(Paradeep Phosphates) , लक्झरी वॉच रिटेल फर्म इथोस आणि भारतातील सर्वात मोठे परवानाधारक प्रमाणित प्राधिकरण ई-मुद्रा या तीन कंपन्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPOS) या आठवड्यात प्राथमिक बाजारात नशीब आजमावणार आहेत. प्रदीप फॉस्फेटचा आयपीओ उद्या म्हणजेच 17 मे 2022 रोजी खुला होईल, तर इथॉस आयपीओ आणि ई-मुद्रा आयपीओ 18 मे आणि 20 मे रोजी पत्ते उघडतील. हे तीन सार्वजनिक आयपीओ मिळून सुमारे 2387 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रदीप फॉस्फेट्स आपल्या आयपीओच्या माध्यमातून 1,502 कोटी रुपये उभारणार आहे, तर इथोस आयपीओच्या (Ethos’ offer) माध्यमातून 472 कोटी रुपये आहे. तर ई-मुद्रा आयपीओच्या (EMudhra IPO)माध्यमातून 412.79 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

प्रदीप फॉस्फेट्स(Paradeep Phosphates)

आयपीओ दिनांक : 17 मे 2022 ते 19 मे 2022 पर्यंत

दर्शनी मूल्य: 10 रुपये प्रति शेअर

आयपीओ किंमत : 39 ते 42 रुपये प्रति शेअर

आयपीओ लॉट साइज: 350 शेअर

कंपनी प्रवर्तक : जुआरी मारोक फॉस्फेट प्रायव्हेट लिमिटेड, झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड, ओसीपी एसए आणि भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयामार्फत काम करणारे भारताचे राष्ट्रपती हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

प्रदीप फॉस्फेटने यापूर्वीच गोल्डमन सॅक्स, बीएनपी परिबाससह अँकर गुंतवणूकदारांकडून 450 कोटी रुपये जमा केले आहेत

एनएसई 2.10 % आर्बिट्रेज, कुबेर इंडिया फंड, कॉपथल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट अँड सोसायटी जनरल

इथॉस आयपीओ

आयपीओ दिनांक : 18 मे ते 20 मे 2022 पर्यंत

आईपीओ फेस व्हॅल्यू : 10 रुपये प्रति शेअर

आयपीओ कीमत: 836 से 878 रुपये प्रति शेअर

IPO लॉट साइज: 17 शेअर्स

कंपनी प्रमोटर : यशोवर्धन साबू, केडीडीएल लिमिटेड आणि माहेन डिस्ट्रिब्युशन लिमिटेड

कंपनी प्रमोटर : यशोवर्धन साबू, केडीडीएल लिमिटेड आणि माहेन डिस्ट्रिब्युशन लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

या पब्लिक ऑफरमध्ये एकूण 375 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि 11,08,037 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) आहे.

इथॉस हा भारतातील सर्वात मोठा लक्झरी आणि प्रीमियम वॉच घाऊक विक्रेता आहे. कंपनी वेबसाइट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फिजिकल स्टोअरद्वारे प्रीमियम लक्झरी घड्याळे वितरीत करते.

ई-मुद्रा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ई-मुद्रा आयपीओ तारीख: 20 मे ते 24 मे 2022 पर्यंत ई-मुद्रा आयपीओ फेस व्हॅल्यू : 5 रुपये प्रति शेअर ई-मुद्रा आयपीओ कीमत: 243 से 256 रुपये प्रति शेअर eMudhra IPO लॉट साइज: 58 शेअर्स

कंपनी प्रमोटर्स : वेंकटरमण श्रीनिवासन आणि तारव पीटीई लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. ई-मुद्रा लिमिटेड हे भारतातील सर्वात मोठे परवानाधारक प्रमाणपत्र प्राधिकरण आहे. कंपनीचा व्यवसाय डिजिटल ट्रस्ट सर्व्हिसेस आणि एंटरप्राइझ सोल्यूशन्समध्ये विभागला गेला आहे.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.