Tupperware: डबे, बाटल्या बनवणारी प्रसिद्ध ‘टपरवेअर’ कंपनी का झाली दिवाळखोर? नेमकं कुठे चुकलं?
'टपरवेअर' डब्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर एकदा तुम्ही तुमच्या घरातील टपरवेअरचा डबा हरवून बघा. त्यानंतर घरच्यांची नको नको ती बोलणी ऐकावीच लागणार, हे काही वेगळं सांगायला नको. इतक्या लोकप्रियतेची कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही धक्का बसला आहे.

भारतातील प्रत्येक घरात ‘टपरवेअर’ कंपनीचा एकतरी डबा किंवा बाटली तुम्हाला आवर्जून आढळणार. ‘टपरवेअर’चे डबे महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. रसरशीत भाजी किंवा डाळसुद्धा जराही बाहेर न सांडता या डब्ब्यांमध्ये व्यवस्थित राहतात. त्याचप्रमाणे ते इथे-तिथे नेण्यासाठीही सहज असतात, त्यामुळे असंख्य महिलांची ‘टपरवेअर’च्या डब्यांना खूप पसंती मिळाली. टपरवेअरचे डबे ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी विसरल्यावर अनेकांनी घरच्यांची नको नको ती बोलणी सहन केली असेल. एक काळ असा होता जेव्हा गृहिणी एखाद्या वेळी आपला स्वत:चा वाढदिवस विसरतील पण आपल्या घरातील टपरवेअरचे डबे कधी आणि कोणाला दिलेत, हे ते विसरणार नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर घर आणि बाजारपेठ ही दोन्ही ठिकाणी ‘टपरवेअर’च्या वस्तूंनी बघता बघता काबीज केली. गृहिणींच्या मनावर तर अधिराज्य वगैरे म्हणतात ते गाजवायलाही या ‘टपरवेअर’नं सुरुवात केली. त्यामुळे मुंबईतल्या खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये लोंबकळत जाणाऱ्या प्रवाशांपासून ते शेकडो खोल्यांच्या महालात इंग्लंडमध्ये राहणऱ्या राणी एलिझाबेथ यांच्यापर्यंत सगळ्यांमध्येच ‘टपरवेअर’ लोकप्रिय ठरू लागलं. घराघरात प्रचंड लोकप्रिय असलेली ही कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे. ...